breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रराजकारण

“लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर काढले तरी टक्के वारी मात्र तुम्ही नक्की घेणार”; राम सातपुतेंचा राष्ट्रवादीला टोला

सोलापूर: महाराष्ट्रात जागतिक महामारीने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. गेल्या तीन दिवसांपासून तब्ब्ल ६७,००० रुग्ण दिवसाला वाढत चालले आहे. राज्यात लसींचा तुटवडा, अपुरा ऑक्सिजनचा साठा आणि रेमेडीसीवर चे कमी प्रमाण यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण पडला आहे आहे . आता राज्य सरकारने लसीकरण वाढवण्यासाठी आणि रेमेडीसीवर औषध साठी एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यात लसीकरण, रेमडेसिवीर इंजेक्शन्ससाठी महाराष्ट्र सरकार ग्लोबल टेंडर काढणार आहे. त्यासाठी पाच जणांची कमिटी नेमणार आहोत.

मुख्य सचिव या कमिटीचे अध्यक्ष असतील. या कमिटीत वरिष्ठ अधिकारी असतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. ते पुण्यात बोलत होते. ते म्हणाले की, ग्लोबल टेंडर काढायच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिल्या आहेत. ही कंपनी ठरवेल की कोणती लस खरेदी करायची. रेमडेसिवीर आणि लस याबाबत ही कमिटी काम पाहिल, असं अजित पवारांनी सांगितलं. ग्लोबल टेंडरबाबत संपूर्ण कॅबिनेटने मुख्य सचिवांना अधिकार दिलेले आहेत. सीरम इन्स्टिट्यूट क्षमतेएवढी लस राज्याला देणार आहे. इतर लसींचाही पर्याय खुला आहे, असंही पवार म्हणाले. 18 वर्षाच्या पुढील सर्वांचे लसीकरण राज्यांनी करावं अशी राज्य सरकारांची भूमिका होती. मात्र केंद्राने ती जबाबदारी राज्यावर ढकलली आहे, असं अजित पवार म्हणाले.

आता राज्यसरकारच्या या निर्णयावर महाराष्ट्रातील विरोधी पक्ष म्हणजेच भारतीय जनता पक्षाने टीका करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार राम सातपुते यांनी राज्य सरकार ताशेरे ओढले आहे. महाराष्ट्रात १०० कोटींची वसुली एका पोलीस अधिकाऱ्याला करायला लावणारा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उर्फ भ्रष्टवादी काँग्रेस. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अथवा महाविकास आघाडीने जरी जनते साठी हे ग्लोबल टेंडर काढले तरी पण ते यामध्ये त्यांच्या सवयी प्रमाणे टक्केवारी मागणार यातशंका नाही. या संदर्भात राम सातपुते यांनी ट्विटर वर ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्ला चढवला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button