breaking-newsक्रिडा

सहावी पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन स्पर्धा आजपासून

पीवायसी क्‍लबमधील 166 खेळाडूंचा स्पर्धेत सहभाग

पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित सहाव्या पीवायसी-ट्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यांत सुधांशु मेडसीकर, अमित देवधर, तन्मय चोभे व केदार नाडगोंडे हे खेळाडू महागडे ठरले आहेत. ही स्पर्धा 2 ते 5 ऑगस्ट 2018 या कालावधीत पीवायसी हिंदू जिमखाना क्‍लबच्या बॅडमिंटन कोर्टवर रंगणार आहे.

स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना पीवायसी हिंदू जिमखानाचे मानद सचिव कुमार ताम्हाणे आणि ट्रूस्पेसचे मालक आश्विन त्रिमल यांनी सांगितले की, स्पर्धेचे हे सहावे वर्ष असून स्पर्धेला ट्रूस्पेस यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. स्पर्धेत 15 वर्षाखालील गट, महिला गट, 45 वर्षावरील गट आणि खुला गट अशा विविध गटातून 166 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धकांची निवड लिलाव पध्दतीने करण्यातआली असून 8 संघांमध्ये याची विभागणी करण्यात आली आहे. या स्पर्धेला पाठिंबा देऊन आम्हाला आनंद झाला आहे. या स्पर्धेद्वारे खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी आम्ही एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देऊ शकलो याचा आम्हाला आनंद असल्याचे आश्विन त्रिमल यांनी सांगितले.

स्पर्धेमध्ये पुरुष, महिला व 45 वर्षांवरील गटातील प्रत्येकी 3 खेळाडूंचा प्रत्येक संघात समावेश असणे अनिवार्य आहे. प्रत्येक सामन्यासाठी गटानुसार 1 गुण दिला जाणार आहे. ही स्पर्धा साखळी व बाद पद्धतीने होणार असून दोन गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक पारितोषिक देण्यात येणार असल्याचे पीबीएलचे आयुक्‍त विवेक सराफ व क्‍लबच्या बॅडमिंटन विभागाचे सचिव शशांक हळबे यांनी सांगितले.

या वर्षीच्या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे या वर्षी सर्वाधिक 166 स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतला आहे. प्रत्येक स्पर्धकाला खेळता यावे अशा पद्धतीने स्पर्धेची आखणी करण्यात आले आहे. महिला व लहान मुलांचा जास्तीत जास्त सहभाग होण्यावर आमचा भर होता. संघातील प्रत्येक स्पर्धकाने किमान एक सामना खेळल्यास या वर्षी प्रत्येक संघाला शंभर टक्‍के सहभागासाठी 3 बोनस गुण देण्यात येणार आहेत, असे हळबे यांनी सांगितले.

स्पर्धेत कॉमेटस्‌ (पराग चोपडा), फाल्कन्स्‌ (मधुर इंगळहाळीकर), इम्पेरिअल स्वान्स (आदित्य काळे), किंगफिशर्स (तन्मय चोभे), ब्लॅक हॉक्‍स (आलोक तेलंग), ईगल्स (अमित देवधर), स्पुटनिक्‍स (बाळ कुलकर्णी) व रायझिंग रावेन्स (केदार नाडगोंडे) हे 8 संघ झुंजणार असल्याचे ताम्हाणे यांनी नमूद केले. एकूण आठ संघांची अ आणि ब अशा दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये साखळी सामन्यांमध्ये प्रत्येक संघ खेळेल. अव्वल दोन संघ उपान्त्य फेरीसाठी पात्र ठरतील. सुवर्ण खुला दुहेरी, रौप्य खुला दुहेरी, सुवर्ण मिश्र दुहेरी, रौप्य मिश्र दुहेरी, रौप्य खुला दुहेरी, लहान वयोगटातील सामना, सुवर्ण 45 वर्षांवरील दुहेरी व सुवर्ण खुला दुहेरी अशा गटांमध्ये सामने होणार आहेत.

स्पर्धेसाठी विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे, यामध्ये शशांक हळबे, विवेक सराफ, उदय साने, गिरिश करंबेळकर, देवेंद्र चितळे, अभिषेक ताम्हाणे, सारंग लागू, बिपिन चोभे, रणजित पांडे, तुषार नगरकर, सिद्धार्थ निवसरकर, अभिजीत खानविलकर, कपिल खरे यांचा समावेश आहे. या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय पंच उदय साने हे चीफ रेफ्री म्हणून काम पाहणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button