breaking-newsपुणेमनोरंजन

कथक नृत्य महोत्सवात नृत्य आविष्काराने रसिक मंत्रमुग्ध

पुणे : कथक केंद्र सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार नवी पिढी यांच्या वतीने ३६ व्या कथक नृत्य महोत्सव पुण्यातील ज्योत्स्ना भोळे सभागृह व अण्णाभाऊ साठे सभागृह येथे पार पडला. दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी कथक केंद्र सल्लागार समिती सदस्य डॉ. नंदकिशोर कपोते उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात नीलिमा अध्ये व अमला शेखर यांनी गुरु रोहिणी भाटे यांच्या नृत्यातील योगदाना विषयी माहिती दिली. यानंतर शमा भाटे व पार्वती दत्ता यांनी साहित्यात कथक या विषयावर आपले विचार व्यक्त केले, सुनील सुंकरा यांनी  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.

दुसऱ्या सत्रात युवा कालाकारांचे कथक नृत्य सादर करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री पं. शेखर सेन, डॉ. नंदकिशोर कपोते, कथक केंद्र अध्यक्षा उमा डोंगरा, संचालीका प्रणामी भगवती उपस्थित होते.यावेळी विधी लाला दिल्ली यांनी तर पं. कृष्ण मोहन महाराज व पं. राममोहन महाराद दिल्ली, अभय सिंह मिश्रा दिल्ली यांनी अप्रतिम कथक नृत्य सादर केले. कार्यक्रमाच्या गुरु  शेवटी शमा भाटे यांच्या विद्यार्थ्यांनी समुह नृत्य कथक  सादर केले.

हेही वाचा – शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी सक्तीची

दुसऱ्या सत्रात गुरु जयंतीमाला यांनी सितारा देवी यांच्या नृत्यातील योगदानाविषयी विस्तृत माहिती सांगितली. डॉ. नंदकिशोर कपोते यांनी सितारादेवी यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनतर कथक मध्ये नाट्य या विषयावर गुरु मनिषा साठे व गुरु राजश्री शिर्के यांनीआपले विचार मांडले. डॉ. पियूष राज यांनी संर्वांशी संवाद साधला.

दुसऱ्या सत्राचे उद्दघाटनडॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.एन.जे.पावर यांच्या हस्ते झाले.यावेळी संजय कुलकर्णी, अध्यक्षा उमा डोगरा, संचालिका प्रणामी भगवती आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुुरुवात ऋतुजा सोमण, प्रेरणा देशपांडे यांच्या कथक नृत्याने झाली. रायगड घराण्याच्या सुचेत्रा हरमळकर यांनी कथक नृत्य सादर करत रसिकांची मने जिंकली. कार्यक्रमाची सांगता लखनौचे गुरु कुमकुमधर यांच्या विद्यार्थ्यांच्या समुह नृत्याने झाली.  या संपुर्ण कार्यक्रमाचे  निवेदन निरीजा आपटे यांनी केले. या शिवाय हॉल बाहेर ज्येष्ठ नृत्यगुरूंच्या छायाचित्रांचे प्रदर्शनही भरवण्यात आले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button