breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

Viral Video : काय सांगता! पुण्यात आढळला पांढरा कावळा..

पुणे : आजपर्यंत आपण कावळा हा काळा रंगाचा पाहिला असेल मात्र आता पुण्यातील लुल्लानगर परिसरामध्ये पांढरा कावळा पाहायला मिळाला. एकूणच पांढऱ्या रंगाचा कावळा पाहिल्यानंतर नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. काळ्या कावळ्यांच्या समूहामध्ये अशा प्रकारचा पांढरा कावळा दिसल्यावर साहजिकच आश्चर्य वाटण्यासारखी बाब आहे.

याआधीही दोन वर्षांपूर्वी शिरूर भागामध्ये अशा प्रकारचा कावळा लोकांच्या दृष्टीस पडला होता. पांढरा कावळा पाहिल्यानंतर परिसरातील नागरिक या कावळ्याचे छायाचित्र घेत आहेत.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पाढऱ्या रंगाचा कावळा हा दहा हजार कावळ्यांमधून एखादा सापडतो. जनुकीय विकारामुळे कावळ्यांमध्ये अल्बिनिझम किंवा ल्यूसिझम म्हणजे पंखांमध्ये रंगद्रव्य साठवण्याची कमतरता कमी असल्याने हा प्रकार आढळतो. परंतु खूप कमी प्रमाणात असे काळे कावळे पाहायला मिळतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button