Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

#SushantSinghSuicideCase: सुशांतकडून टॅलेंट मॅनेजर जया साहाच्या खात्यात तब्बल 10 कोटी, ईडीकडून कसून चौकशी

मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूतची टॅलेंट मॅनेजर जया साहा हिला सुशांतकडून 10 कोटी रुपये मिळाल्याचे ईडीच्या चौकशीत समोर आलेले आहे. जाहिरातीच्या कमिशनपोटी ही रक्कम घेतल्याचा दावा तिने केलेला असला तरी एवढी मोठी रक्कम असल्याने तपास यंत्रणा चक्रावलेल्या आहेत. जया साहा ही सुशांतकडे वर्षभरापासून टॅलेंट मॅनेजर म्हणून काम पाहत होती. त्याला चित्रपट व जाहिरातीचे काम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी तिच्यावर दिलेली होती.

आधी दिशा सालियन हे काम सुशांतसाठी करत होती, तिने काम सोडल्यावर जयाने या कालावधीत सुशांतकडून 10 कोटी रुपये कमावले असल्याचे बँक अकाउंटवरुन स्पष्ट झाले आहे. अधिकाऱ्यांनी त्याबाबत विचारले असता आपण ही रक्कम जाहिरातींचे कमिशन म्हणून घेतल्याचे जयाने सांगितलेले आहे. सहसा या कामासाठी कलाकारांना मिळणाऱ्या मानधनाच्या 3 ते 5 टक्के रक्कम कमिशन म्हणून घेतली जाते. त्यामुळे सुशांतने गेल्या वर्षभरात किती जाहिराती केल्या, याचा सविस्तर तपशील तिच्याकडून मागवण्यात आलेला आहे.

सुशांतने जयाला 10 टक्के कमिशन दिले, असे गृहित धरले तरी त्यासाठी एका वर्षात सुशांतने जवळपास 100 कोटीपर्यंत मानधन मिळवून देणाऱ्या जाहिराती केल्या पाहिजेत. मात्र, तितकी त्याची मिळकत नसल्याची माहिती आहे. त्यामुळे जया हिने 10 कोटी का घेतले? याबाबत चौकशी केली जात असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button