Breaking-newsमहाराष्ट्र

शहरासाठी आता आरोग्य संचालक, आरोग्यमंत्र्यांची माहिती

कोरोना पार्श्वभूमीवर शहरी भागातील आरोग्य व्यवस्था अधिक परिणामकारक करण्यासाठी आरोग्य संचालक (शहरी) हे नवीन पद निर्माण करण्यात आले असून त्यासोबतच अन्य सहा पदे देखील निर्माण करण्यात आली आहेत अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी दिली. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

साथरोग नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्याबरोबरच आरोग्य सेवा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगरविकास विभाग यांच्यात समन्वयाची जबाबदारी संचालकांवर राहिल. त्यांच्यासोबत उपसंचालक राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, उपसंचालक संसर्गजन्य रोग नियंत्रण तसेच कुटुंब कल्याण, इतर आरोग्य कार्यक्रम, जलजन्य, किटकजन्य आजार आणि इतर सांसर्गिक,असांसर्गिक आजार या विभागांसाठी चार सहायक संचालक असतील अशी माहितीही राजेश टोपे यांनी दिली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button