अभिनेता सोनू सूद याच्या पत्नीचा नागपूरच्या डबल डेकर उड्डाण पुलावर अपघात
अपघातात पत्नी सोनाली सूद आणि मेहुणी सुनीता साळवे जखमी

मुंबई : अभिनेता सोनू सूद याची ओळख अभिनेता म्हणून तर आहेच, परंतु तो एक दिलदार, दयावान आणि मसिहा म्हणूनही ओळखला जातो. परंतु सोनू सूदसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. सोनू सूदच्या पत्नी सोनालीचा नागपूरजवळ भीषण अपघात झाला आहे. सोमरात्री रात्री हा अपघात झाला असून या अपघातात पत्नी सोनाली सूद आणि मेहुणी सुनीता साळवे जखमी झाले आहेत.
सोनू सूदला अपघाताविषयी कळताच तो तातडीने नागपूर रुग्णालयात दाखल झाला. माहितीनुसार गाडीमध्ये सोनू सूदची पत्नी सोनाली सूद, सोनालीची बहिण सुमिता साळवे आणि पुतणी होते. तिघांनाही नागपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिघेही कारने प्रवास करत असताना त्यांच्या कारने ट्रकला धडक दिली.
हेही वाचा – ऊर्जा विभागाच्या शंभर दिवसांच्या रिपोर्ट कार्डचे मा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
कसा झाला अपघात?
– सोमवारी रात्री साडे दहा वाजेदरम्यान ट्रकला कार धडकल्याने अपघात झाला.
– नागपूरच्या वर्धा रोड परिसराच्या डबल डेकर उड्डाण पुलावर अपघात.
– अपघातात सोनू सूद यांच्या पत्नी सोनाली सूद आणि मेहुणी सुनीता साळवे जखमी झाली.
– नागपूरच्या मॅक्स केअर रुग्णालयात दोघांनाही उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे..
– गाडीचे एयर बॅग वेळेवर उघडल्याने कोणालाही गंभीर इजा झाली नाही. परंतु अपघातात कारचे मोठे नुकसान झालं.
– सोनू सूदच्या कुटुंबियांना तात्काळ नागपूरच्या मॅक्स केअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
– सोनू सूद मूळचा नागपूरचा असून बहीरामजी टाऊन परिसरात सोनू सूदचे सासरचे लोक राहतात..
– अपघात झालेला वाहन हे सोनेगाव पोलीस स्टेशनमध्ये ठेवले आहे.
सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असून नागपूरमधील मॅक्स रुग्णालयात त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. सोनलीचा पुतण्याला जास्त दुखपत झाली नसल्याने त्याच्यावर उपचार करून सोडण्यात आलं आहे.
सोनू सूदची पत्नी सोनाली सूद ही सिनेसृष्टीपासून लांब राहते. सोनू सूदने 1996 मध्ये सोनालीशी लग्न केलं होतं. त्यांना दोन आपत्य सुद्धा आहे. अयाश आणि इशांत अशी दोघांची नावे आहे.