breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

२०२४ च्या निवडणुकांनंतर सरकार घटना बदलणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले..

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अवघे काही महिन्यांचा कालावधी उरला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा सरकारवर टीका केली जात आहे. तसेच, २०२४ च्या निवडणुकांनंतर सरकार घटना बदलणार असल्याचा दावा केला जात आहे. यावरून, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्पष्टीकरण दिलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, लोकांना हे समजलं आहे की आता देश मोठी भरारी घेण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. त्यामुळे २०२४च्या निवडणुकांमध्ये आमचा विजय होईल, याविषयी मला पूर्ण खात्री आहे. लोकांना ही भरारी घ्यायची आहे. आणि कोणत्या पक्षानं देशाला इथपर्यंत मजल मारून दिली याचीही लोकांना पूर्ण कल्पना आहे”, असंही मोदी म्हणाले. “देशातील सामान्य माणसाच्या आयुष्यात मोदी सरकारने मोठा बदल घडवू आणला असून १० वर्षांपूर्वीच्या त्यांच्या अपेक्षा आणि आजच्या त्यांच्या अपेक्षा यात जमीन-आस्मानाचा फरक आहे.

हेही वाचा  –  ‘स्वत:ला देशभक्त म्हणवणारे पळून गेले’; राहुल गांधींचा भाजप खासदारांवर हल्लाबोल 

विरोधकांना त्यांची बाजू मांडण्याचा, व्यक्त होण्याचा अधिकार आहे. पण या सगळ्या आरोपांची समस्या ही आहे की लोकशाही धोक्यात आल्याचे दावे करणं म्हणजे फक्त देशातील नागरिकांच्या बौद्धिक कौशल्याचा अपमान नसून त्यांच्या लोकशाहीप्रती असलेल्या बांधिलकीलाही दुय्यम ठरवण्यासारखा हा प्रकार आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

२०२४च्या निवडणुकांनंतर सरकार घटना बदलणार असल्याचा दावा पंतप्रधान मोदींनी फेटाळला आहे. हे सर्व दावे निरर्थक आहेत, असं मोदी म्हणाले. आमच्या सरकारने देशात राबवलेल्या स्वच्छ भारत अभियानपासून देशातील १ बिलियन लोकसंख्येला डिजिटल विश्वाशी जोडण्यापर्यंतच्या योजना या राज्यघटना बदलून नव्हे, तर लोकांच्या सहभागातून साध्य करून दाखवल्या आहेत, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button