साईबाबा साकारणारे सुधीर दळवी रुग्णालयात दाखल
कुटुंबाकडून आर्थिक मदतीची हाक
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांना सध्या उपनगरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सेप्सिस या आजारावर उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी एकूण 15 लाख रुपयांची आवश्यकता आहे. त्यांच्या प्रकृतीविषयीचे वृत्त समोर येताच सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त केले जात आहे. दरम्यान, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी लागणाऱ्या निधीची उभारणी केली जात आहे. त्यासाठी अभिनेत्या आणि गायिका टीना घई यांनी पुढाकार घेतला असून सर्वांनी जमेल तशी मदत करावी, असे आवाहन केले आहे.
साईबाबा साकारणारे दळवी यांच्यावर उपचार सुरू
मिळालेल्या माहितीनुसार सुधीर दळवी यांच्यावर सध्या सेप्सिस या आजारावर उपचार सुरू आहेत. जे मनोज कुमार यांच्या 1977 साली आलेल्या चित्रपटात त्यांनी साईबाबांची भूमिका साकारली होती. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी पडद्यावर साईबाबाचे पात्र जिवंत करून दाखवले होते. म्हणूनच त्यांच्या या कामचे आजही कौतुक केले जाते. सुधीर दळवी यांनी रामानंद सागर यांच्या सुप्रसिद्ध रामायण या मालिकेत गुरु वशिष्ठांची भूमिका केली होती. त्यांचे हे कामदेखील चांगलेच चर्चेचा विषय ठरले. क्योंकी सास भी कभी बहू थी या टीव्ही मालिकेत त्यांनी केलेले काम आजही लोकांच्या स्मरणात आहे. त्यांना आता सेप्सिस आजाराची लागण झाली आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा – पंतप्रधान मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमातून राष्ट्रविकासाचा संदेश – दिनेश यादव
टीना घई उभारत आहेत निधी
दळवी यांच्यावर उपचार करण्यासाठी आतापर्यंत 10 लाखांपेक्षा अधिक रुपये खर्च झाले आहेत. आता पुढील उपचारासाठी साधारण 15 लाख रुपये लागणरा आहेत. हाच निधी उभारण्याचे काम टीना घई करत आहेत. याबाबत बोलताना “सुधीर अंकल याना सेप्सिस या आजारावर उपचार करण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. मी माझ्या मित्रांशी तसेच इतरांशी आर्थिक मदतीसाठी संपर्क करत आहे,” असे त्यांनी सांगितले. टीना यांनी आतापर्यंत अनेक कलाकारांना आर्थिक पाठिंबा मिळावा यासाठी मदत केलेली आहे. यात अभिनेत्री रेहाना सुलतान यांच्यासह अनेक कलाकारांचा समावेश आहे.




