प्राजक्ता माळीचा कर्जतमधील फार्म हाऊसची झलक तुम्ही पाहिली आहे का?
प्राजक्ताने गेल्या वर्षी साधारण जुलै महिन्यात कर्जत येथे फार्महाऊस घेतला.फार्महाऊसला तिने 'प्राजक्तकुंज' असे नाव

पुणे : अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सतत चर्चेत असते. कधी तिच्या खासगी आयुष्यामुळे तर कधी चित्रपटांमुळे. प्राजक्ताचा मोठा चाहता वर्ग आहे. तिच्या आयुष्यात नेमकं काय सुरु आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर असतात. गेल्या वर्षी प्राजक्ताने कर्जत येथे एक फार्महाऊस घेतला. या फार्म हाऊसची झलक तुम्ही पाहिली आहे का? नाही ना मग चला पाहूया…
प्राजक्ताने गेल्या वर्षी साधारण जुलै महिन्यात कर्जत येथे फार्महाऊस घेतला.फार्महाऊसला तिने ‘प्राजक्तकुंज’ असे नाव दिले. कोट्यवधी रुपये खर्च करून उभा केलेला हा फार्महाऊन प्राजक्ताने भाड्याने देण्यास सुरुवात केली आहे. काढलेलं कर्ज फेडण्यासाठी तिने हे फार्महाऊस भाडेतत्त्वावर देण्याचं ठरवलं. हास्यजत्रेच्या कलाकारांनीही प्राजक्ताच्या फार्म हाऊसवर हजेरी लावली होती.
हेही वाचा : इस्लामिक राष्ट्राची पेरणी : काय आहे वक्फ बोर्ड? महाराष्ट्रात कधी झाली वक्फची स्थापना? वाचा!
गेल्या वर्षी तिच्या या फार्म हाऊसमध्ये फारशी झाडं पाहायला मिळाली नव्हती पण आता १ वर्षात इथल्या परिसरात मोठा बदल झालेला पाहायला मिळत आहे. चोहो बाजूने डोंगर आणि हिरवीगार फुलझाडं तिने या फार्म हाऊसमध्ये लावली असून पावसाळ्यानंतर आता ती छान बहरली आहेत.
अभिनेत्रीच्या फार्महाऊसचं नाव ‘प्राजक्तकुंज’ असं असलं तरी, ‘द ग्रीन मोन्टाना’ या नावाने तिने हा सुंदर व्हिला एका नामांकित कंपनीकडे रजिस्टर केला असं बोललं जात आहे