Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

‘लँडलॉर्ड’ ते ‘मेड इन कोरिया’, या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणार ‘हे’ दाक्षिणात्य चित्रपट; वाचा यादी…

OTT Releases This Week : या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर विविध प्रकारच्या प्रादेशिक कथा पाहायला मिळणार आहेत. त्यात व्यंगात्मक कॉमेडी, सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करणारे, अॅक्शन ड्रामा, प्रेमकथा व भावनिक कुटुंबकथा यांचा समावेश आहे. प्रादेशिक सिनेमा आता ओटीटीवर विकसित होत असून, दिग्दर्शक स्थानिक संस्कृतीची झलक दाखवत प्रेम, महत्त्वाकांक्षा, ओळख यांसारख्या सर्व विषयांना नव्या पद्धतीनं मांडत आहेत.

या आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या कलाकृतींमध्येही विविधता स्पष्ट दिसून येते. प्रेक्षकांना कॉमेडी, जमिनीच्या हक्कांवर आधारित दमदार कन्नड ड्रामा, भारत-कोरिया संस्कृतीचा भावनिक प्रवास दाखवणारी कथा आणि मैत्रीवर आधारित तमीळ कथा पाहायला मिळणार आहे. त्याशिवाय रिअॅलिटी शो, अँथॉलॉजी प्रकारातील कथा आणि आधुनिक नातेसंबंधांवर आधारित ड्रामा हे सर्व या आठवड्यात पाहायला मिळणार आहे.

“भर्ता महाशयुलकु विग्न्याप्ती” (Bhartha Mahasayulaku Wignyapthi) – किशोर तिरुमाला यांच्या या तेलुगू कॉमेडी चित्रपटामध्ये अभिनेता रवी तेजा राम सत्यनारायण या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. स्पेनला व्यवसायाच्या दौऱ्यावर असताना केलेल्या एका अचानक झालेल्या प्रेमसंबंधानंतर, एका यशस्वी वाइननिर्मात्याचे सुखी व स्थिर कौटुंबिक आयुष्य हळूहळू विस्कळित होऊ लागते. हे यामध्ये पाहायला मिळतं. १३ मार्चला झी ५वर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

फंकी – के. व्ही. अनुदीप दिग्दर्शित तेलुगू कॉमेडी ‘फंकी’ चित्रपटसृष्टीतील अनपेक्षित गोंधळावर हलक्याफुलक्या शैलीत टोला लगावतो. या चित्रपटात विश्‍वक सेन कोमल नावाच्या विचित्र स्वभावाच्या दिग्दर्शकाची भूमिका साकारतोय, जो त्याचा पहिला चित्रपट ‘फंकी’ पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. सुरुवातीला छोट्या बजेटचा वाटणारा हा प्रकल्प लवकरच नियंत्रणाबाहेर जातो आणि चार कोटींचं बजेट थेट तब्बल ४० कोटींवर पोहोचतं. १३ मार्चला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे.

लँडलॉर्ड – १९८० च्या दशकातील ग्रामीण कर्नाटकाच्या खडतर पार्श्वभूमीवर आधारित लँडलॉर्ड हा दमदार कन्नड अॅक्शन सिनेमा आहे. हा चित्रपट सन्मान आणि जमिनीच्या हक्कांसाठी झालेल्या ऐतिहासिक संघर्षाची कथा सांगतो. या चित्रपटात दुनिया विजय (Duniya vijay) रचय्या या शांत स्वभावाच्या मजुराची भूमिका साकारतो. तो अशा गावात येतो, जिथे क्रूर सरंजामी मालक सन्ना धनी (राज बी. शेट्टी) याचं वर्चस्व असतं. जमिनीच्या हक्कांशी संबंधित एका दुर्दैवी घटनेनंतर गावातील दडपलेल्या लोकांमध्ये असंतोष उसळतो आणि त्या परिस्थितीत रचय्या बंडाचं नेतृत्व करण्यास पुढे येतो. अशी काहीशी या चित्रपटाची कथा आहे. १३ मार्चला झी ५वर हा चित्रपट पाहता येईल.

हेही वाचा –  विधिमंडळाचा अवमान भोवला; राष्ट्रवादीचे सूर्यकांत मोरे यांना ३० दिवसांचा तुरुंगवास

मेड इन कोरिया – रा कार्तिक (Ra karthik) दिग्दर्शित आणि प्रियांका मोहन मुख्य भूमिकेत असलेला हा चित्रपट १२ मार्च रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. हा तेलुगू चित्रपट आहे, एका तरुण महिलेभोवती फिरतो, जिला दक्षिण कोरियाला जायचं असतं. हा चित्रपट दक्षिण कोरियामध्येच चित्रित झाला आहे.

Naangal अंशतः आत्मचरित्रावर आधारित आणि अंतर्मुख करणारा नांगल हा तमीळ चित्रपट भाऊबंदकी आणि बालपणीच्या मानसिक आघातावर आधारित आहे. १९९० च्या दशकाच्या शेवटी उटी येथे घडणारी ही कथा कार्तिक, ध्रुव व गौतम या तीन भावांच्या आयुष्याभोवती फिरते. ते त्यांचे वडील- राजकुमार (अब्दुल रफे) यांच्या कठोर दबावाखाली वाढत असतात. आर्थिक अडचणी आणि वैयक्तिक निराशेमुळे त्रस्त झालेले वडील घराला खूप कडक शिस्त लावतात. त्यामुळे घरातील वातावरण तणावपूर्ण आणि अस्वस्थ बनते. दिग्दर्शक अविनाश प्रकाश यांनी चित्रपटात एक खास दृश्यात्मक तंत्र वापरले आहे. वडिलांच्या दडपशाहीचे जग दाखवण्यासाठी ब्लॅक अँड व्हाइटमधील दृश्ये दाखवली आहेत; तर मुलांना मिळणाऱ्या थोड्याशा स्वातंत्र्याच्या क्षणी रंगीत दृश्यांमधून दाखवलं आहे. शेवटी हा चित्रपट कठीण परिस्थितीतही टिकून राहण्याची ताकद, आठवणी आणि संकटांमध्येही भावंडांना एकत्र बांधून ठेवणाऱ्या नात्याची भावनिक कथा सांगतो. १३ मार्चपासून सन एनएक्सटीवर हा चित्रपट पाहता येइल.

Made For Eachother – तेलुगू रिअॅलिटी शो Made For Each Other हा सेलिब्रिटींच्या नातेसंबंधांना एका वेगळ्या आणि तणावपूर्ण प्रयोगात रूपांतरित करतो. या शोचे सूत्रसंचालन श्रीमुखी करत असून दिग्दर्शन अनिल रवीपुडी यांनी केले आहे. या शोमध्ये १० प्रसिद्ध जोडपी तब्बल ७० दिवस एका आलिशान ‘लव्ह मॅन्शन’मध्ये एकत्र राहतात. १५ मार्चपासून जिओ हॉटस्टारवर हा शो प्रसारित होणार आहे.

नानखटाई – हा गुजराती अँथॉलॉजी चित्रपट प्रेम, स्वाभिमान व चिकाटी हे गुणांवर आधारलेल्या तीन भावनिक कथा एकत्र आणतो. दिग्दर्शक प्रीतसिंह गोहिल यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून, नेहमीच्या हलक्याफुलक्या विनोदी शैलीऐवजी त्यांनी अधिक विचार करायला लावणारी कथा मांडली आहे. या चित्रपटातील प्रत्येक कथा वेगवेगळ्या कुटुंबांवर आधारित आहे, जे अडचणी आणि भावनिक जखमांवर मात करण्याचा प्रयत्न करत असतात. ज्या गोड बिस्किटावरून चित्रपटाचे नाव ठेवले आहे, त्याप्रमाणेच हा चित्रपटही उबदारपणा आणि वास्तव यांचा सुंदर संगम दाखवतो. साध्या माणसांच्या आयुष्यातील शांत चिकाटी आणि आशा कसे त्यांचे जीवन घडवते, हे यात दाखवले आहे. १२ मार्चला हा चित्रपट ‘शिमारो’वर पाहता येइल.

नवाब कॅफे – नवाब कॅफे हा तेलुगू चित्रपट परंपरा व पिढ्यांमधील संघर्षावर आधारित भावनिक कथा सांगतो. या चित्रपटात शिवा कंदुकुरी राजा नावाच्या तरुण इंजिनीयरची भूमिका साकारतो. त्याचं परदेशात जाऊन चांगली नोकरी करण्याचं स्वप्न असतं. पण, त्याचे वडील त्याच्या स्वप्नाच्या विरोधात असतात. ते त्यांच्या शेकडो वर्षे जुना कौटुंबिक व्यवसाय त्यानं सांभाळावा यासाठी आग्रही असतात. १२ मार्चला ETV Win वर हा चित्रपट प्रदर्शित होइल.

Pookie -हा एक रोमँटिक तमीळ चित्रपट आहे. त्यामध्ये एकमेकांपासून दूर लाँग टर्म रिलेशनशिपमध्ये असलेल्या जोडप्याची गोष्ट पाहायला मिळते. परंतु, त्यांच्यातील एका वादामुळे ते अचानक सोशल मीडियावर खूप व्हायरल होतात. जोडप्यांमधील राग, अहंकार, प्रेम आणि हल्लीचे नवीन रिलेशनशिप यांवर हा चित्रपट आधारित आहे. १३ मार्चला हा चित्रपट झी ५वर प्रदर्शित होणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button