Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडी

लिवर डिटॉक्सिफाय करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी गाजराच्या ज्यूसमध्ये मिक्स करून प्या ‘हे’ तीन पदार्थ

Health : निरोगी शरीर राखण्यात लिवर महत्त्वाची भूमिका बजावते. हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे जो 50 हून अधिक कार्ये करतो. हार्मोनचे उत्पादन असो किंवा प्रथिने संश्लेषण असो लिवरशिवाय शरीर अनेक कार्ये करू शकत नाही. मात्र आजच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे लिवरवर अनेकदा भार पडतो. जी लोकं अल्कोहोल आणि जास्त प्रथिने घेतात यामुळे याचा लिवर भार वाढतो आणि लिवरच्या कार्यावर परिणाम होण्यास सुरूवात होते. परंतु आयुर्वेदाात लिवरचे कार्य सुधारण्याचे अनेक मार्ग सांगितले आहे. फॅटी लिवर ही आजकाल एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला त्यांच्या आहारामुळे फॅटी लिवरची समस्या भेडसावते परंतु आयुर्वेद काही पद्धती सांगतो ज्या लिवरला विषमुक्त करण्यास आणि निरोगी ठेवण्यास मदत करू शकतात. चला तर मग आजच्या लेखात आपण याबद्दल जाणून घेऊयात.

गाजर, सफरचंद, द्राक्ष आणि पुदिना एकत्र करून ज्यूस बनवा. तर हा ज्यूस बनवताना यात साखर किंवा मीठ मिक्स करू नका आणि सकाळी रिकाम्या पोटी या ज्यूसचे सेवन करा. हा ज्यूस केवळ फॅटी लिवरसाठीच नाही तर कावीळसाठी देखील फायदेशीर आहे. दररोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन केल्याने अनेक फायदे मिळू शकतात.

हेही वाचा –  ‘लँडलॉर्ड’ ते ‘मेड इन कोरिया’, या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणार ‘हे’ दाक्षिणात्य चित्रपट; वाचा यादी…

  1. गाजर-

गाजर लिवरच्या पेशींना बळकटी देतात आणि त्यांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात. तसेच गाजरामधील घटक लिवरवरील अधिकचा दबाव देखील कमी करतात.

  1. सफरचंद-

सफरचंदातील गुणधर्म लिवरची जळजळ कमी करण्यास मदत करतात आणि पेशींच्या पुनरुत्पादनात देखील मदत करतात.

  1. द्राक्ष-

द्राक्ष हे असं एक फळ आहे जे लिवरमधील एंजाइम वाढवते, जे प्रथिनांचे पचन आणि संश्लेषण करण्यास मदत करते.

  1. पुदिना

पुदिना केवळ या ज्यूसची चव वाढवत नाही तर लिवरमधील निर्माण होणाऱ्या समस्या कमी करण्यास देखील मदत करतो. एकंदरीत हा ज्यूस लिवरला ताजेतवाने करेल आणि त्याचे कार्य करण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा प्रदान करतात.

लिवर निरोगी ठेवण्यासाठी काय खावे?

लिवरच्या चांगल्या आरोग्यासाठी तुमच्या आहारात भरपूर हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. हिरव्या पालेभाज्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि क्लोरोफिल भरपूर प्रमाणात असते, जे लिवरला विषमुक्त करण्यास मदत करते. तसेच सूर्यास्तानंतर खाणे टाळा. जर तुम्हाला भूक लागली असेल तर खिचडी किंवा सूपसारखे हलके जेवण सेवन करा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button