Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘नाशिक त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा’; मंत्री प्रकाश आबिटकर’

मुंबई : नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या भाविकांना आरोग्य सेवा देण्यास आरोग्य यंत्रणा पूर्णतः सज्ज ठेवण्याचे निर्देश  सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

आरोग्य मंत्रालयातील समिती कक्षात आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधाचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नाशिक परिमंडळातील आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री आबिटकर म्हणाले की, यंदा सिंहस्थ पर्वणी निमित्त नाशिक मधील तेरा घाटावर अंदाजे १२ कोटी भाविक येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक लोकप्रतिनिधी, कुंभमेळा प्राधिकरण आणि विविध विभागांच्या समन्वयातून त्र्यंबक, रामकुंड, सीता गुंफा, साधू धाम, मुक्ती धाम व इतर धार्मिक स्थळावर आरोग्य सुविधा सक्षम करण्यावर भर देण्यात यावा.  लवकरच स्वतः नाशिक येथे भेट देऊन आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

हेही वाचा –  ‘पश्चिम क्षेत्रीय कृषी परिषदेमुळे कृषी क्षेत्राला नवी दिशा’; मंत्री दत्तात्रय भरणे

सिंहस्थ पर्वणी काळात गर्दीमुळे संपर्क यंत्रणेत अडचणी निर्माण होऊ नसे यासाठी आरोग्य विभागाने रुग्णसेवेसाठी वॉकी-टॉकीचा वापर करणे, त्याबाबतची  माहिती अद्यावत ठेवण्यासाठी स्वतंत्र नियंत्रण प्रणाली उभारण्याचे निर्देशही आरोग्य मंत्री आबिटकर यांनी दिले.

देशभरातून येणाऱ्या भाविकांनी कोणत्याही प्रकारची वैद्यकीय गैरसोय होऊ नये, याची काळजी घ्यावी. आरोग्य सेवा व्यवस्थापनासाठी विविध स्तरांवर जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाने व्यापक तयारी करण्याचे निर्देशही मंत्री आबिटकर यांनी दिल्या.

कुंभमेळ्याच्या दरम्यान रोगराईचा प्रसार रोखण्यासाठी नाशिक, त्र्यंबक, रामकुंड, सीतामंडी व इतर सर्व धार्मिक स्थळावरील स्वच्छतेवर विशेष भर द्यावा. पाण्याच्या स्रोतांची तपासणी करावी. ‘आरोग्य रक्षक किट’ व पुरेसा औषध साठा उपलब्ध ठेवण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button