ताज्या घडामोडीमनोरंजन

कपिल शर्मा शोमध्ये काम करणारे दास दादा म्हणजे कृष्णा दास यांचं निधन

‘द कपिल शर्मा शो’मधील कलाकारांमध्ये शोककळा

मुंबई : विनोदवीर आणि अभिनेता कपिल शर्मा याच्या शोमध्ये सुरुवातीपासून काम करणारे दास दादा म्हणजे कृष्णा दास यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाानंतर ‘द कपिल शर्मा शो’मधील कलाकारांमध्ये शोककळा पसरली आहे. शिवाय कृष्णा दास यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कृष्णा दास हे कपिल शर्मा याच्यासोबत काम करत होते. बराच काळ त्यांनी शोमध्ये असोसिएट फोटोग्राफर म्हणून काम केलं. ते अनेक वेळा टीव्हीवर देखील दिसले. आता त्यांच्या निधनाबद्दल, टीम कपिल शर्माने इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

कपिल शर्मा याच्या टीमने एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यामध्य दादा स्टेजवर एन्ट्री करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये देखील कृष्णा दास यांच्या गळ्यात कॅमेरा लटकलेला दिसत आहे. शिवाय काही शॉट्स देखील आहे, ज्यामध्ये कृष्णा दास वेगवेगळ्या सेलिब्रिटींसोबत डान्स देखील करताना दिसत आहेत.

व्हिडीओ पोस्ट कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘आज प्रचंड वाईट वाटत आहे. आम्ही दास दादा यांना गमावलं आहे. ज्यांनी आपल्या कॅमेऱ्याने द कपिल शर्मा शोच्या सुरुवातीपासूनच असंख्य आठवणी कैद केल्या… ते फक्त एसोसिएट फोटोग्राफर नाही तर, एक कुटुंब होते.’

हेही वाचा –  सांगलीत पावसामुळे जनजीवन विस्कळीत, ग्रामीण भागात पाऊस थांबण्याची प्रतीक्षा

‘कायम सर्वांना हसत ठेवायचे. त्यांनी प्रत्येक क्षण आमच्यासोबत शेअर केला. दादा तुमची खूप आठवण येईल. तुमच्या आत्म्याला शांती लाभो. तुमच्या आठवणी प्रत्येक कोपऱ्यात आणि प्रत्येक हृदयात राहतील.’ असं देखील व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

दास दादा हृदयरोगाने ग्रस्त होते. गेल्या वर्षी त्यांच्या पत्नीचे निधन झालं, त्यानंतर ते एकटे पडले. दास दादा जास्त काळ हा एकटेपणा सहन करू शकले नाहीत. एवढंच नाही तर वाढत्या हृदयरोगामुळे ते काम देखील करू शकत नव्हते. टीव्ही९ डिजिटलला मिळालेल्या माहितीनुसार, दासदादा मुंबईजवळील अंबरनाथमध्ये राहत होते.

सध्या सोशल मीडियावर दास यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवरील एक नेटकरी दुःख व्यक्त करत म्हणाला, ‘ओम शांती… ते मला प्रचंड आवडायचे’ अनेकांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button