Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

पहिल्याच टप्प्यात चार नवीन ‘उड्डाणपूल’; पुणे-छत्रपती संभाजीनगर महामार्गाची क्षमता वाढविण्याचे नियोजन

पुणे : पुणे-छत्रपती संभाजीनगर महामार्गाची क्षमता वाढविण्याबरोबरच नव्याने पुणे-छत्रपती संभाजीनगर ग्रीन कॉरिडॉरची उभारणी करणे, अशी दोन्ही कामे स्वतंत्रपणे हाती घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ही दोन्ही कामे महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडे (एमएसआयडीसी) देण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात जुन्या महामार्गावर चार नवीन उड्डाणपूल आणि रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचआय) माध्यमातून पुणे-छत्रपती संभाजीनगर आणि पुणे-बंगळूर या दोन ग्रीन कॉरिडॉरचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी महामार्ग प्राधिकरणाकडून सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती.

हेही वाचा  –  मोशी येथील स्पाईन सिटी चौकातील खड्डादेत आहे अपघातांना आमंत्रण; लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचे दुर्लक्ष

या कंपन्यांकडून प्रायोगिक तत्त्वावर रस्त्याचे आरेखन करून सर्वंकष प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू होते. त्यानुसार सल्लागार कंपनीकडून प्रारूप आराखडाही तयार करण्यात आला. असे असताना सहा महिन्यांपूर्वी राज्य सरकारडून ‘एमएसआयडीसी’ची स्थापना करण्यात आली.

त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाऐवजी हे काम ‘एमएसआयडीसी’च्या माध्यमातून करण्याचा निर्णय झाला. सध्या असलेल्या पुणे-छत्रपती संभाजीनगर महामार्गाचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याकडे आहे. मध्यंतरी एमएसआयडीसी आणि सार्वजनिक बांधकाम खाते यांच्यात एकत्रित बैठक झाली. त्यामध्ये ग्रीन कॉरिडॉरसाठी मोठ्या प्रमाणावर भूसंपादन करावे लागेल.

त्यामुळे सध्या जुन्या महामार्गाची क्षमता वाढविण्याला प्राधान्य द्यावे. त्यानंतर ग्रीन कॉरिडॉरचे काम हाती घेण्यात यावे, असा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जुन्या महामार्गाच्या सक्षमीकरणाच्या कामाचा आराखडा तयार करण्याच्या कामाला प्राधान्य देण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button