ताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

हिट अँड रन प्रकरणी अभिनेत्री शिवानी सिंगने गमावले प्राण

शिवानीला डॉक्टरांनी केले मृत घोषित

वांद्रे : हिट अँड रन प्रकरणांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. आता देखील एका 25 वर्षीय अभिनेत्री आणि मॉडेलला हिट अँड रन प्रकरणात स्वतःचे प्राण गमवावे लागले आहेत. ज्यमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. वांद्रे येथे झालेल्या अपघातात 25 वर्षीय अभिनेत्री शिवानी सिंग हिला प्राण गमवावे लागले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवानी सिंग असे मॉडेलचे नाव आहे. ती तिच्या मित्रासोबत मोटरसायकलच्या मागच्या सीटवर बसली होती.

वांद्रे पश्चिम येथील आंबेडकर रोडवरील कलंत्री चौकातून जात असताना त्यांच्या दुचाकीला डंपर चालकाने धडक दिली. या घटनेत शिवानी डंपरच्या चाकाखाली आली तर तिचा मित्र काही अंतरावर पडला. दोघांनाही जखमी अवस्थेत भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण रुग्णालयात शिवानीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

शिवानी कुठे राहत होती?
शिवानी मालाडमध्ये राहत होती आणि ती फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत होती. तिच्या मित्राचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अभिनेत्रीच्या मित्राने हेल्मेट घातलं होतं. प्राथमिक तपासात अभिनेत्री मित्र दारूच्या नशेत नसल्याचं समोर आलं आहे. तपासात पोलिसांना नशेची कोणतीही चिन्हे दिसली नाहीत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे फरार डंपर चालकाचा शोध सुरू आहे. डंपर जप्त करण्यात आला आहे.

मुंबईत हिट अँड रन
सांगायचं झालं तर, मुंबई हिट अँड रन प्रकरणांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. ज्यामुळे शहरातील वाहतूक सुरक्षा आणि नियमांवर सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिसांनी लोकांनी आवाहन केलं आहे की वाहतुकीच्या नियमांचं पालन करा. अपघात झाल्यास तत्काळ पोलिसांना कळवा. एवढंच नाही तर, पोलिसांनी देखील आरोपीला लवकरच पकडून शिक्षा होईल असं सांगितलं आहे.

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button