‘चित्रपटात आक्षेप असलेले दृश्य आम्ही काढून टाकणार’; दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांची माहिती
![Director Laxman Utekar said that we will remove objectionable scenes from the film](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/Director-Laxman-Utekar-said-that-we-will-remove-objectionable-scenes-from-the-film-780x470.jpg)
Chhaava Movie Controversy | विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेत आला आहे. मात्र ट्रेलरमधल्या एका सीन वरून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. दरम्यान, या सीनबद्दल एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मंत्री आणि शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते उदय सामंत यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. वादग्रस्त ‘लेझीम नृत्याचा’ सीन काढला जाणार असल्याचे आता समोर आले आहे. तशी माहिती मंत्री उदय सामंत तसेच दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी दिली आहे.
हेही वाचा : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने प्रजासत्ताक दिन साजरा
दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त केले. छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांना लेझीम खेळताना दाखवण्यात आले आहे. या चित्रपटासाठी आम्ही चार वर्षे रिसर्च केला. छत्रपती संभाजीराजे हे महान योद्धे, राजे होते हे जगाला कळावे हाच या चित्रपटीमागील उद्देश आहे. पण काही दृश्यांना गालबोट लावले जात असेल आणि शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असतील तर ते डिलीट करायला हरकत नाही. लेझीम हा पारंपरिक खेळ आहे. महाराज लेझीम खेळले नसतील का? असा आमचा प्रश्न आहे. महाराज लेझीम खेळले असतील असे आम्हाला वाटले, असे लक्ष्मण उतेकर यांनी सांगितले.