Breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र
#CoronaVirus: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पुणे दौऱ्याची दाट शक्यता

पुणे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुणे दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसात उद्धव ठाकरे दौऱ्याला निघण्याची चिन्हं आहेत. पुण्यात ‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुख्यमंत्री आढावा बैठक घेण्याचेही संकेत मिळत आहेत. पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दर आठवड्याला पुण्यात आढावा बैठक घेताना दिसत असतात.
परंतु “मुख्यमंत्री ‘मातोश्री’बाहेर पडत नाहीत, राज्याच्या दौऱ्यावर जात नाहीत” अशी तक्रार भाजपकडून सातत्याने होत आहे. मुंबईत असूनही शेजारी जिल्हा पुण्यात न आल्याने उद्धव ठाकरेंविरोधात विरोधक आक्रमक झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुणे दौऱ्याचे नियोजन होताना दिसते आहे.





