ताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

बॉलिवूडचे दिग्दर्शक महेश भट्ट यांचे हिंदू – मुस्लिम मुद्द्यावर मोठं वक्तव्य

शिष्टाचाराचं रत्न होतो. शिष्टाचार… सत्य असलेल्या ...

मुंबई : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या घटनेवरून देशभरात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी ज्या पद्धतीने 28 निष्पाप लोकांना त्यांचा धर्म विचारून मारलं ते अत्यंत संतापजनक आहे. हल्ल्यानंतर मोदी सरकराने अनेक मोठे निर्णय घेत पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं आहे. एवढंच नाही तर, अनेक सेलिब्रिटींनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून तिव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता बॉलिवूडचे दिग्दर्शक महेश भट्ट यांनी देखील हिंदू – मुस्लिम मुद्द्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. शिवाय महेश भट्ट यांनी लहानपणीचं उदाहरण देखील दिलं आहे.

नुकताच झालेल्या मुलाखतीत महेश भट्ट म्हणाले, ‘माझी आई सिया मुसलमान होती आणि वडील नागर ब्राह्मण… लहानपणी आई माझी तयारी करायची आणि शाळेत पाठवायची तेव्हा सांगायची बेटा तू एक नागर ब्राह्मणाचा मुलगा आहे. भार्गव गोत्र आहे आणि आश्विन शाखा आहे. जेव्हा तुला भीती वाटेल तेव्हा फक्त म्हण की ‘या अली मदद कर”

हेही वाचा –  “शिंदे त्यांच्याच गावाला गेले, तुमच्या नेत्यासारखे लंडनला गेले नाहीत”; उदय सामंत यांचा टोला

पुढे महेश भट्ट म्हणाले, ‘तेव्हा आम्ही हिंदूस्तानसाठी एक उदाहरण होतो. शिष्टाचाराचं रत्न होतो. शिष्टाचार… सत्य असलेल्या या संस्कृतीला, जखमेसारखे वाहून नेण्याची वेळ येईल असं आपल्याला कधीच वाटलं नव्हतं.’ सध्या सर्वत्र महेश भट्ट यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

महेश भट्ट यांच्या करीयरबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी अनेक हीट सिनेमे बॉलिवूडला दिले आहे. महेश भट्ट यांनी अर्थ, सारांश, नाम, लहू के दो रंग, डॅडी, आशिकी, दिल है कि मानता नहीं, गुनाह, सर, नाजायज, पापा कहते हैं, ये है मुंबई मेरी जान आणि सडक 2 अशा अनेक सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे.

महेश भट्ट यांनी मुलगी आणि अभिनेत्री आलिया भट्ट आता बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानी आहे. आलियाने देखील आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. चाहते देखील आलियाच्या आगामी सिनेमाच्या प्रतिक्षेत असतात. आलिया भट्ट फक्त तिच्या प्रोफेशनल नाही तर खासगी आयुष्यामुळे देखील असते चर्चेत…

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button