Breaking-newsआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय

भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त

नवी दिल्ली : काही वेळापूर्वी पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारताच्या सीमेजवळील ३ राज्यांमध्ये ड्रोन हल्ले केले. या हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने आता जोरदार पलटवार केला आहे. एकीकडे ड्रोन हल्ला सुरू असताना भारतीय नौदलाने कराची बंदरावर जोरदार हल्ला केला आहे. नौदलाच्या तुफान हल्ल्यामुळे कराची बंदर उद्धवस्त झालं आहे.

लाहोर आणि सियालकोट नंतर आता पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबादमध्ये देखील भारतीय सैन्यांने हल्ला केला आहे. रात्री जवळपास सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास भारतीय सैन्याने इस्लामाबादला लक्ष्य केले. इस्लामाबादच्या प्रमुख चौकांमध्ये आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट पसरलेले दिसले.

हेही वाचा –  भारताचे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर; लाहोरमध्ये केला ड्रोन हल्ला

दिवसभरात पाकिस्तानने २ मोठे हल्ले केले आहे. पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्याची अमेरिकेनं दखल घेतली आहे. भारतावर हल्ले लगेच थांबवा, तुम्ही लगेच माघार घ्या, अशा शब्दांत अमेरिकेनं पाकिस्तानला खडसावलं आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button