ताज्या घडामोडीमनोरंजन

अनिल कपूर यांची आई निर्मल कपूर यांचे निधन

कपूर कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

मुंबई : प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर, चित्रपट निर्माते बोनी कपूर आणि अभिनेता संजय कपूर यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अनिल कपूर यांच्या मातोश्री निर्मल कपूर यांचे वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले आहे. निर्मल कपूर यांच्या निधनामुळे त्या तिघांच्या डोक्यावर आईचे छत्र हरपले आहे. कपूर कुटुंबासह चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

निर्मला कपूर यांचे निधन २ मे रोजी सायंकाळी झाले. याबद्दल अद्याप कुटुंबाकडून कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. मात्र, यामुळे संपूर्ण बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. गेल्या आठवड्याभरापासून त्या मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल होत्या. याच ठिकाणी आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

हेही वाचा –  “यावेळी फक्त घरात घुसुन मारू नका तर त्यांच्या…’ ; असदुद्दीन ओवैसींचे पाकविरुद्ध कारवाईसाठी सरकारला आवाहन

निर्मल कपूर यांनी २७ सप्टेंबर २०२५ रोजी यांचा ९० वा वाढदिवस होता. त्यावेळी अनिल कपूर यांनी सोशल मीडियावर आपल्या आईसोबतच्या अनेक खास आठवणींच्या फोटोंचे कोलाज शेअर केले होते. या फोटोंमध्ये अनिल कपूर यांच्यासोबत संजय आणि बोनी कपूरदेखील दिसत होते. यात संपूर्ण कुटुंब एकत्र खूप आनंदी दिसत होते. या फोटोंमध्ये अनिल कपूर यांची पत्नी सुनीता कपूर या देखील सासूबाईंच्या बाजूला बसलेल्या दिसत होती. तर बोनी कपूरची मुलगी जान्हवी कपूर आणि संजय कपूरची मुलगी शनाया कपूरही दिसत आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button