‘गदर २’ च्या निर्मात्यांवर अभिनेत्री अमीषा पटेलचा गंभीर आरोप; म्हणाली..

Gadar 2 : ‘गदर २’ सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. तब्बल २२ वर्षानंतर पुन्हा एकदा अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमीषा पटेलची जोडी प्रेक्षकांना एकत्र पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. मात्र, चित्रपट एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. अभिनेत्री अमीषा पटेलने निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
अमीषा पटेलने ट्वी करत म्हटलं आहे की, चित्रपटाच्या निर्मितीची संपूर्ण जबाबदारी दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्या प्रोडक्शन हाऊसने सांभाळली होती. परंतु, या टीमने आजपर्यंत मेकअप आर्टिस्टपासून ते कपडे डिझाइन करणाऱ्या कर्मचाऱ्यांपर्यंत असंख्य लोकांचे त्याचे पगार दिलेले नाही. या सर्व लोकांना पगारच नाही तर अनेकदा शूटिंगदरम्यान झालेला खर्च आणि विमानाच्या तिकीटांचे पैसेही देण्यात आले नव्हते.
https://twitter.com/ameesha_patel/
हेही वाचा – स्लेजिंगबाबत यशस्वी जैस्वालचं मोठं विधान; म्हणाला, कोणी जर माझ्या आई-बहिणीबद्दल बोलले तर..
शूटिंगला कुठेही जाण्यासाठी एकही गाडी देण्यात आली नव्हती त्यामुळे अनेकदा कलाकार आणि क्रू मेंबर्स अडकायचे. पण, या सगळ्या अडचणी झी स्टुडिओजने सोडवल्या. त्यांनी सगळ्या कर्मचाऱ्यांचे पैसे दिले यासाठी शारिक पटेल, नीरज जोशी, कबीर घोष यांचे विशेष आभार!, असं अभिनेत्री अमीषा पटेलने म्हटलं आहे.
https://twitter.com/ameesha_patel/
दरम्यान, ‘गदर २’ चित्रपट ११ ऑगस्टला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केलं आहे. तर पहिल्या भागाचेही दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केलं होतं.





