breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

स्लेजिंगबाबत यशस्वी जैस्वालचं मोठं विधान; म्हणाला, कोणी जर माझ्या आई-बहिणीबद्दल बोलले तर..

Yashasvi Jaiswal : भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी काही दिवसातच रवाना होणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. युवा खेळाडू यशस्वी जौसवाल याला कसोटी आणि वनडे संघात संधी मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर यशस्वी जैस्वालने एका मुलाखतीत स्लेजिंगविषयी भाष्य केलं आहे. सोबतच अजिंक्या रहाणेने रागात मैदानाबाहेर पाठवल्याच्या घटनेवरही प्रतिक्रिया दिली आहे.

यशस्वी जैस्वाल म्हणाला की, आता ज्या गोष्टी होऊन गेल्या आहेत त्याबद्दल बोलून काय उपयोग. खरं तर मी मानसिकदृष्ट्या खूप आक्रमक आहे. मला वाटतं कधी कधी ही गोष्ट बाहेर येते. पण मी त्यावेळी काही मोठं बोललो नाही पण हो ठीक आहे गोष्टी घडत राहतात आणि नंतर त्याबद्दल बोलण्यात काही अर्थ नाही.

हेही वाचा – जागतिक बँकेकडून भारताताला ‘नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन’साठी १.५ अब्ज डॉलरचा निधी मंजूर

मला काहीही बोलायचे नाही. मला ते माझ्याजवळच ठेवायला आवडेल. जेव्हा मला ते बोलावे वाटेल, तेव्हा मी त्यावर बोलेन. क्रिकेटचा कोणताही फॉरमॅट खेळला जात असला तरी वाद हे सर्रास घडतात. हे आयपीएलसारख्या इव्हेंटमध्ये जितके स्पष्ट होत नाही, तितके मोठ्या फॉरमॅटच्या क्रिकेटमध्ये होते. त्यामुळे कोण काय म्हणतंय यावर अवलंबून असते. जर कोणी माझ्या आईबद्दल किंवा बहिणीबद्दल काही बोलले, तर मी ते अजिबात सहन करणार नाही, असंही यशस्वी जैस्वाल म्हणाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button