डोनाल्ड ट्रम्प आणि प्रियाच्या या अदाकाराचा व्हिडिओ पाहिलात का ?

नॅशनल क्रश म्हणून प्रसिद्धी मिळवणारी प्रिया प्रकाश वॉरियरने अनेक तरुणांना तिच्या नजरेने घायाळ केलं. सगळ्या सोशल प्लॅटफॉर्मवर प्रियाच्या व्हिडिओनं धुमाकूळ घातला होता. प्रियकराच्या दिशेनं नजरेचे बाण मारणारी एक शाळकरी मुलगी या व्हिडिओत दिसतेय. तिच्या अदांनी तरुणाईला ‘दिवानं’ करून सोडलं होतं.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत डोळा मारणारी ही तरुणी देशभरातील लाखो तरुणांच्या हृदयाची धडकन झाली… ‘ओरु अदार लव्ह’ या मल्ल्याळम चित्रपटातून प्रियाने पदार्पण केलं… पण आता याच तिच्या नजरेनं चक्क डोनाल्ड ट्रम्प यांनीही घायाळ केलं आहे…
आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आज भारतात आगमन झालं आहे. डोनाल्ड ट्रम्प प्रथमच भारतभेटीवर आले आहेत..तसेच मोटेरा स्टेडियमवरील ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमात सहभागीही झालेत. तर याच कार्यक्रमाला अनूसरूण सोशल मिडियावर एका युजर्सनं डोनाल्ड ट्रम्प आणि प्रियाच्या या अदाकाराचा व्हिडिओ ट्विट केला आहे…म्हणजे ट्र्म्प भारत दौ-यावर आहेत
#MelaniaInIndia #NamasteTrump #NaMosteTrump #TrumpIndiaVisit #MondayMotivation #MondayMood असं लिहून त्यांच्या येण्यानं भारतीयांचा मुड कसा आहे हे ,सांगण्याचा अगदी मिश्किलपणे प्रयत्न केला आहे…





