Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं DDLJ आणि ‘शोले’ चित्रपटांचं कौतूक…

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत. यादरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी अहमदाबाद येथील जगातील सर्वात मोठं स्टेडियम ‘मोटेरा’ येथे ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमात भारतीयांना संबोधित केलं. यावेळी, ट्रम्प यांनी बॉलिवूड सिनेमांचंही तोंडभरुन कौतुक केलं. त्यांनी शाहरुख खान-काजोलच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’ या सिनेमाचा उल्लेख केला.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “भारतीय सिनेसृष्टी खूप मोठी आहे. इथे दरवर्षी जवळपास दोन हजार सिनेमे तयार होतात. इथल्या सिनेमांमध्ये भांगडा आणि संगीत उत्कृष्ट असतो”. तसेच, ट्रम्प यांनी शाहरुख खान आणि काजोलचा लोकप्रिय सिनेमा ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’ आणि ऐतिहासिक अशा ‘शोले’ सिनेमाचंही कौतुक केलं.

शिवाय, त्यांनी भारतीय खेळाडूंचंही कौतुक केलं. भारताने जगाला सचिन तेंडूलकर, विराट कोहली सारखे बडे खेळाडू दिले, असंही ट्रम्प म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button