Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

खासदार संजय राऊत घाईघाईनं ‘मातोश्री’वर दाखल! कंगना प्रकरणावर खलबतं

मुंबई: अभिनेत्री कंगना रनौत विरुद्ध शिवसेना वादात पक्षाची भूमिका हिरीरीनं मांडणारे खासदार संजय राऊत तातडीनं ‘मातोश्री’ निवासस्थानी दाखल झालेले आहेत. कंगनासह विरोधकांकडून पक्षावर होणाऱ्या टीकेला उत्तर द्यायचं की नाही? दिल्यास कसं उत्तर द्यायचं? यावर दोन्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राऊत यांच्यात चर्चा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मुंबईबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या कंगना रनौत विरोधात शिवसेनेनं जोरदार आघाडी उघडलेली आहे.

सुरुवातीला हा वाद शाब्दिक युद्धापर्यंत मर्यादित होता. मात्र, शिवसेनेनं कंगनाच्या कार्यालयावर महापालिकेच्या माध्यमातून कारवाई केल्यामुळं शिवसेनेवर टीका होऊ लागली आहे. विरोधी पक्ष भाजप उघडपणे कंगनाच्या बाजू घेत शिवसेनेला घेरलं आहे. महापालिकेच्या कारवाईची वेळ चुकल्याचं मत अनेक जाणकारांनी व्यक्त केलेलं आहे. त्यामुळं शिवसेना काहीशी बॅकफूटवर गेलेली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button