breaking-newsताज्या घडामोडीपुणे

सर्वांच्या संमतीनंतरच पुण्यात ‘नाइट लाइफ’ – पालकमंत्री अजित पवार

पुणे|महाईन्यूज|प्रतिनिधी|

‘मुंबईत नाइट लाइफचा निर्णय घेतला म्हणून लगेचच पुण्यातही तो लागू करता येणार नाही. आपण पुणेकर असून पुणेकरांचे, स्वयंसेवी संस्थांचे मत वेगळे असू शकते. त्यामुळे मुंबईत नाइट लाइफचा निर्णय लागू झाल्यावर त्यातून काय अनुभव येतो, हे पाहूनच पुणेकरांना मान्य होईल असा निर्णय घेतला जाईल,’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

मुंबई पाठोपाठ पुण्यातही ‘नाइट लाइफ’ सुरू करण्याची आग्रही मागणी होत आहे. यासंदर्भात पुणे आणि पिंपरी चिंचवडकडून प्रस्ताव आल्यास विचार करू, असे संकेतही पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर औंध येथील उरो रुग्णालयात पोलिओ लसीकरण मोहिमेचा प्रारंभ केल्यानंतर पवार पत्रकारांशी बोलत होते. ‘मुंबईचे जगणे वेगळे असते. मुंबई कधीच झोपत नाही, असे म्हटले जाते. हे शहर २४ तास जागे असते. त्यामुळे तेथे नाइट लाइफ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अनुभवातून काय निष्पन्न होते, ते पाहूनच पुण्यात नाइट लाइफचा निर्णय घेतला जाईल. पुणेकरांना मान्य होईल, असाच निर्णय घेतला जाईल,’ असेही पवार यांनी नमूद केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button