पुणेमहाराष्ट्र

मध्य रेल्वेच्या अकरा कर्मचा-यांचा महाव्यवस्थापक संरक्षा पुरस्काराने सन्मान

मुंबई l प्रतिनीधी

मध्य रेल्वेच्या तत्पर कर्मचा-यांमुळे रेल्वेचे होणारे संभाव्य मोठे अपघात टळले. कर्तव्यादरम्यान सतर्कता दाखवणा-या 11 तत्पर कर्मचा-यांचा महाव्यवस्थापक संरक्षा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. यामध्ये मुंबई विभागातील तीन, नागपूर, पुणे, भुसावळ आणि सोलापूर विभागातील प्रत्येकी दोन अशा 11 मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांच्या हस्ते सोमवारी (दि. 7) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

पदक, प्रशंसा प्रमाणपत्र, अनुकरणीय संरक्षा कार्याचे प्रशस्तिपत्रक आणि दोन हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी अतिरिक्त महाव्यवस्थापक बी.के. दादाभोय, प्रधान मुख्य संरक्षा अधिकारी आलोक सिंग, प्रधान मुख्य परिचालन व्यवस्थापक मुकुल जैन, प्रधान मुख्य अभियंता अश्वनी सक्सेना, प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त अजोय सदानी, मध्य रेल्वेच्या इतर विभागांचे प्रधान प्रमुख उपस्थित होते.

अनिल कुमार लाहोटी म्हणाले की, “पुरस्कार विजेत्यांनी प्रशंसनीय काम केले आहे आणि संरक्षित कामासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांनी दाखवलेली 24 x 7 सतर्कता इतरांना प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रामाणिकपणे काम करण्यासाठी प्रेरणा देईल.”

सुरेखा वाघमारे (पॉइंटस्वुमन, कुर्ला, मुंबई) यांना 26 नोव्हेंबर 2021 रोजी ट्रेन क्र. 22222 ला हँड सिग्नलची देवाणघेवाण करताना ट्रेनच्या पाचव्या डब्यात धूर दिसला. त्यांनी ताबडतोब ट्रेनला लाल सिग्नल दाखवला आणि त्वरीत स्टेशन मॅनेजरला कळवले. दादर स्टेशनवर आग विझवण्यात येईल याची खात्री केली. सुरेखा यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अनुचित घटना टळली.

मृत्युंजय कुमार चौधरी (लोको पायलट, पनवेल) हे 29 जानेवारी 2022 रोजी गुड्स ट्रेनमध्ये काम करत असताना, महापे लूप लाईनमध्ये प्रवेश करत असताना एका ट्रॉलीमधून असामान्य आवाज ऐकू आला, त्यांनी लगेच गुड्स ट्रेन थांबवली. तपासणीत ट्रॉलीचे दुय्यम सस्पेन्शन कॉइल स्प्रिंग तुटलेले आढळले. त्यांनी याबाबत संबंधित अधिकार्‍यांना कळवले आणि संबंधित लोको वेगळे केले. ते सुरक्षितपणे वेगाने चालवून दुरुस्तीसाठी पाठवले. चौधरी यांच्या सतर्कतेने आणि सावधगिरीने संभाव्य अपघात टळला.

प्रवीण तिकोणे (असिस्टंट लोको पायलट – मेल, पनवेल) हे 29 जानेवारी 2022 रोजी गुड्स ट्रेनमध्ये काम करत असताना, महापे लूप लाईनमध्ये प्रवेश करत असताना त्यांना एका ट्रॉलीमधून असामान्य आवाज आला, त्यांनी लगेच गुड्स ट्रेन थांबवली. तपासणीत ट्रॉलीचे दुय्यम सस्पेन्शन कॉइल स्प्रिंग तुटलेले आढळले. संबंधित अधिकार्‍यांना त्यांनी याची माहिती दिली आणि सुरक्षितपणे वेगाने चालवून दुरुस्तीसाठी संबंधित विशिष्ट लोको वेगळे केले. प्रवीणच्या सतर्कतेने संभाव्य अपघात टळला.

राहुल साहू (असिस्टंट स्टेशन मॅनेजर, घोटी, भुसावळ) यांनी २७ जानेवारी २०२२ रोजी ट्रेन क्र. 22538 ला हँड सिग्नलची देवाणघेवाण करताना पाहिले की, आठव्या आणि नवव्या कोचचे सर्व ब्रेक पॅड जमिनीला लागत आहेत आणि चालत असताना धूर निर्माण करत आहेत. त्यांनी ताबडतोब वॉकी-टॉकी वापरून क्रू कंट्रोलला ट्रेन थांबवण्याची माहिती दिली. रेल्वे गार्डसह, पॅन्ट्री कारमध्ये दिलेल्या अग्निशामक यंत्राच्या मदतीने आग आणि धूर आटोक्यात आणला. साहू यांनी वेळीच केलेल्या कारवाईमुळे संभाव्य अपघात टळला.

मुकेशकुमार चौधरी (गार्ड, भुसावळ) यांना ट्रेन क्र. 22538 ला वॉकी टॉकीद्वारे माहिती मिळाली की, आठव्या आणि नवव्या कोचचे सर्व ब्रेक पॅड चालताना जमिनीला लागत असून धूर निर्माण करत आहेत. संदेश मिळताच त्यांनी तात्काळ ट्रेन थांबवली आणि स्टेशन मॅनेजरच्या मदतीने पँट्री कारमध्ये दिलेल्या अग्निशामक यंत्राचा वापर करून आग आटोक्यात आणली. त्यांनी तातडीने केलेल्या कारवाईमुळे संभाव्य अपघात टळला.

लखन रामनाथ (चावीवाला (किमन) जुन्नारदेव, नागपूर) हे 10 फेब्रुवारी 2022 रोजी ट्रॅकवर गस्त घालत असताना त्यांना किलोमीटर 912/19-20 येथे एक रेल्वे फ्रॅक्चर (रुळाला तडा) दिसला. लगेच लखन यांनी ट्रेन क्र. 01319 आणि सर्व संबंधितांना कळवले आणि वेल्ड फ्रॅक्चर दुरुस्ती करीता उपस्थित राहिले. त्यांनी वेळीच केलेल्या कारवाईमुळे पुढील ट्रेनला होणारी अनुचित घटना टाळता आली.

अनुप कुमार (सहाय्यक लोको पायलट, बल्हारशाह, नागपूर) यांनी 9 फेब्रुवारी 2022 रोजी चिकणी स्टेशनच्या लूप लाईनवर गुड्स ट्रेनच्या 23739 आणि 23689 लोकोमोटिव्हच्या (इंजिनच्या) अंडर गियरची तपासणी करताना तिसर्‍या वॅगनच्या सीबीसी (CBC) कपलिंगमध्ये क्रॅक दिसला. क्रॅक लक्षात येताच अनुप कुमार यांनी सर्व संबंधितांना माहिती देऊन वॅगन वेगळी केली आणि मालगाडी रवाना केली.

जी.एन. जोशी (लोको पायलट, मिरज, पुणे) हे 14 फेब्रुवारी 2022 रोजी ट्रेन क्र. 12780 वर कर्तव्यावर असताना किमी 93/8 येथे रुळावर एक सिमेंटचा खांब दिसला. त्यांनी ताबडतोब ट्रेन थांबवली, खांब काढला आणि पुढे निघाले.  जोशी यांच्या तत्परतेने आणि सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळला.

अविनाश पवार (लोको पायलट, मिरज, पुणे) यांनी 16 फेब्रुवारी 2022 रोजी गुड्स ट्रेनचा पदभार स्वीकारल्यानंतर, लोकोची तपासणी केली असता, काँप्रेसरचा पाया सैल आणि लटकलेला आढळला. ताबडतोब संबंधित विभागाला त्यांनी कळवले आणि तंत्रज्ञ हजर झाले. त्यांच्या कर्तव्यातील सतर्कता आणि प्रामाणिकपणामुळे संभाव्य दुर्घटना टळली त्याबद्दल पवार यांचे कौतुक करण्यात आले,

अमरनाथ मौर्या (स्टेशन मॅनेजर, मुंडेवाडी, सोलापूर) यांना 12 फेब्रुवारी 2022 रोजी मुंडेवाडी येथे जाणाऱ्या मालगाडीला सिग्नल देताना मालगाडीच्या पाचव्या वॅगनमधून एक धातू लटकलेला आणि रुळांना स्पर्श करताना दिसला.  हे लक्षात येताच मौर्य यांनी ताबडतोब रेड सिग्नल दिला, ट्रेन थांबवली आणि ते ठीक केले. मौर्य यांनी दाखविलेल्या कर्तव्यातील बांधिलकी आणि सतर्कतेमुळे एक संभाव्य दुर्घटना टळली.

गौरव कुमार (ट्रॅकमन IV, दौंड, सोलापूर) यांना 4 फेब्रुवारी 2022 रोजीच्या मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास गस्त घालताना किमी 286/1-2 येथे रेल्वे फ्रॅक्चर (रुळाला तडा) दिसला. त्यांनी ताबडतोब त्यांच्या वरिष्ठांना कळवले जे रुळाचा तडा दुरुस्ती/बदलण्याकरिता त्वरित हजर झाले. गौरव कुमार यांनी दाखवलेली सतर्कता आणि वेळीच कारवाईमुळे संभाव्य अपघात टळला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button