breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

पेट्रोलच्या दरात आज वाढ नाही, मात्र डिझेलचे दर वधारले

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असतानाच बुधवारी पेट्रोलियम कंपन्यांनी मोठा दिलासा दिला आहे. दररोज वाढणाऱ्या पेट्रोलच्या दरातून सर्वसामान्यांना आज सुटका मिळाली आहे. मात्र, डिझेलचे दर वधारले आहेत. नवी दिल्लीमध्ये आज डिझेलच्या दरात प्रति लिटर २४ पैशांनी वाढ झाली आहे. तर मुंबईमध्ये डिझेलच्या दरात प्रति लिटर २५ पैशांनी वाढ झाली आहे. मुंबईमध्ये आज डिझेल प्रति लिटर ७७.९३ रूपये तर दिलल्लीमध्ये डिझेल प्रति लिटर ७४.३५ रूपये असणार आहे. आज पेट्रोलचे दर स्थिर आहेत.

ANI

@ANI

Diesel price at Rs 74.35 per litre (increased by Rs 0.24 per litre) in Delhi and Rs 77.93 (increased by Rs 0.25 per litre) in Mumbai

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button