मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संजय राऊतांना टोला; म्हणाले, राऊत आले नाहीत का?

मुंबई : छत्रपती संभाजी नगरमध्ये आज कॅबिनेटची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी इंडिया आघाडी आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना टोला लगावला.
माझी इच्छा झाली तर मी पत्रकार परिषदेत प्रश्न विचारायला जाईन. मी संपादक आहे आणि महाराष्ट्रातला ज्येष्ठ संपादक आहे. त्या नात्याने मला मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. मात्र मी जर गेलो तर गोंधळ निर्माण होईल आणि ते मला नको आहे, असं खासदार संजय राऊत म्हणाले होते.
हेही वाचा – राज्य सरकारची मोठी घोषणा! मराठवाड्यातील विविध योजनांसाठी ४५ हजार कोटींची तरतूद
दरम्यान, यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे. राऊत आले नाहीत का? असं एकनाथ शिंदे म्हणताच हशा पिकला. त्यानंतर ते विकास राऊत हो..असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.