breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘..तर भर चौकात जोड्याने मारतो’; एकनाथ खडसेंचं गिरीश महाजनांना प्रत्युत्तर

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्या छातीत दुखू लागलं होतं. त्यांना हृदयविकाराचा त्रास झाला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने त्यांच्यासाठी एअर अँब्युलन्सची व्यवस्था केली होती. यावरून भाजप नेते गिरीश महाजन यांनी टोला लगावला होता. त्यावर आता एकनाथ खडसेंनी महाजनांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

एकनाथ खडसे यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ते म्हणाले की, गिरीश महाजन यांनी माझ्या आजारावर प्रतिक्रिया दिली. मला वाटतं त्यांचं वय साठ वर्षांचं होत आलंय त्यामुळे साठी आणि बुद्धी नाठी असं होतंय. त्यामुळे त्यांना काही सुचत नाही असं दिसतंय. वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना त्यांनी स्त्रीरोगांकडे जास्त लक्ष दिलं त्यामुळे त्यांचं हृदयरोगांकडे कमी लक्ष गेलं. त्यांना जर खात्री करायची असेल तर माझी कागदपत्रं तपासावीत त्यात कार्डिअॅटिक अरेस्ट काय असेल तो देखील पाहून घ्यावा.

हेही वाचा – MPSC Exam Timetable 2024 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०२४ मधील परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर 

माझं हृदय बंद पडलं होतं. बंद पडलेलं हृदय सुरु करण्यासाठी अथक परिश्रम डॉक्टरांना करावे लागले. ७० ते ८० लाख लोकांमधून एखादा अशा अवस्थेतून परत येतो, तसा मी परत आलो. कारण संत मुक्ताबाईंचे आणि अनेकांचे आशीर्वाद माझ्या पाठिशी होते. पण आता गिरीश महाजन यांना हे कसं कळणार? असं एकनाथ खडसे म्हणाले.

मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंटला गिरीश महाजन यांनी जे चाळे केले त्यामुळे त्यांनी हकालपट्टी झाली. आता माझं गिरीश महाजन यांना आव्हान आहे, माझ्या सगळ्या कागदपत्रांची खात्री करावी. माझा आजार खरा आहे की खोटा आहे हे त्यांनी तपासून घ्यावं. जर त्यांना हे सांगता आलं की माझा आजार खोटा आहे, सहानुभूती मिळावी म्हणून मी हे केलं आहे तर गिरीश महाजन यांनी भर चौकात मला जोडे मारावेत. पण माझी कागदपत्रं खरी आहेत हे सिद्ध झालं तर मी गिरीश महाजन यांना भर चौकात जोडे मारायला तयार आहे. मला वाटतं गिरीश महाजन माझं आव्हान स्वीकारतील आणि जोडे खायला तयार होतील. जर चुकीचं असेल तर मी जोडे खायला तयार आहे, असंही एकनाथ खडसे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button