breaking-newsताज्या घडामोडीपुणे

हिंजवडी परिसरात आज (9 जुलै) पासून ते 16 जुलै पर्यंत कडकडीत लॉकडाऊन

मुंबईसह पुण्यातही कोरोनाचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्यामुळे पुण्यासह पिंपरी-चिंचवड मध्येही दोन -दोन दिवस जनता कर्फ्यू लागू करण्यात येत आहे. मात्र आजपासून म्हणजे 9 जुलै पासून आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीसह परिसरात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्थानिकांकडून कडकडीत लॉकडाऊन पाळण्यात आला आहे. हिंजवडीसह मान, मारुंजी, जांबे, नेरे, या ठिकाणी ही लॉकडाउनची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवा आणि आयटी कंपन्यांना यामधून वगळण्यात आल्याचे स्थानिकांनी स्पष्ट केले आहे.

हिंजवडी परिसरात आज पासून १६ जुलै पर्यंत कडकडीत लॉकडाऊन पाळला जाणार आहे. दरम्यान, यामधून अत्यावश्यक सेवा, आयटी कंपनी तसेच बांधकाम सुरू असलेल्या साईट्सना वगळण्यात आले आहे. अशी माहिती हिंजवडीच्या सरपंच आरती वाघमारे आणि मारुंजी सरपंच पूनम बुचडे यांनी दिली आहे.

अत्यावश्यक सेवा वळगून पहाटे ६ ते ९ यावेळेत दूध पुरवठा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन, ही कडक पावलं उलचण्यात आल्याचे सरपंचांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, हिंजवडी परिसरात विनामास्क नागरिक आढळल्यास त्याला ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button