breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबई

संजू सॅमसन श्रीलंकेविरूद्धच्या उर्वरित टी-20I मालिकेतून बाहेर

संजू सॅमसनच्या जागी जितेश शर्माला मिळणार भारतीय संघात संधी

पुणे : भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसन श्रीलंकेविरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतून बाहेर पडला आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर 1ल्या टी-20I दरम्यान सीमारेषेजवळ चेंडू फील्ड करण्याचा प्रयत्न करताना सॅमसनच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली. त्यामुळे तो होणाऱ्या उर्वरित मालिकेतून बाहेर असणार आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष जय शहा यांनी ही माहिती दिली आहे.

बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने आज दुपारी त्याला स्कॅन आणि तज्ज्ञांच्या मतासाठी मुंबईत नेले आहे. त्याला विश्रांती, पुनर्वसनाचा सल्ला देण्यात आला. तर उर्वरित सामन्यासाठी अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने संजू सॅमसनच्या जागी जितेश शर्माची निवड केली आहे. भारत 5 जानेवारी 2023 रोजी पुण्यात श्रीलंकेविरुद्ध दुसरा टी-20 सामना खेळणार आहे.

श्रीलंकेच्या टी-20I साठी भारताचा संघ :
हार्दिक पंड्या (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button