breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

करण जोहरचे ७ वर्षांनंतर दिग्दर्शन क्षेत्रात पुनरागमन, नव्या चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज!

रणवीर सिंह-आलिया भट्ट 'या' चित्रपटात दिसणार एकत्र

Rocky And Rani : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री आलिया भट्ट सध्या त्यांच्या आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. आता रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट लवकरच चाहत्यांना थिएटरमध्ये पाहायला मिळणार आहे.

आज या चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर रिलीज केले आहे. करण जोहर दिग्दर्शित हा चित्रपट येत्या २८ जुलै रोजी रिलीज होणार आहे. रणवीर आणि आलियाशिवाय धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी हे दिग्गज कलाकारही या चित्रपटात दिसणार आहेत.

हेही वाचा – ‘राष्ट्रवादी काँग्रेसचा केजरीवालांना पूर्णपणे पाठिंबा’; शरद पवार

आज (२५ मे) निर्माते आणि चित्रपटाच्या टीमने सोशल मीडियावर त्याचे फर्स्ट लुक पोस्टर जारी केले असता हे पोस्टर्स रिलीज होताच व्हायरल झाले आहे. या माध्यमातून करण जोहर ७ वर्षांनंतर दिग्दर्शन क्षेत्रात पुनरागमन करत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button