breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारणव्यापार

जरंडेश्वर साखर कारखाना कर्ज प्रकरणी सातारा जिल्हा बँकेला ‘ईडी’ची नोटीस!

मुंबई |

जरंडेश्वर साखर कारखान्याला केलेल्या कर्जपुरवठ्याची माहिती अंमलबजावणी संचालनालयाने सातारा जिल्हा बँकेला मागितली आहे. या बाबतची नोटीस नुकतीच बँकेला बजावण्यात आली. यामुळे सहकार बँकिंग क्षेत्रात एकच खळबळ उडाली. दरम्यान या कारखान्याला केलेला कर्जपुरवठा रिझर्व्ह बँक व नाबार्डच्या धोरणानुसारच केलेला असल्याचे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी सांगितले आहे.

मागील आठवड्यात साताऱ्यातील चिमणगाव (ता.कोरेगाव) येथील जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीने जप्तीची कारवाई केल्यानंतर आता या कारखान्याला कर्ज केलेल्या सातारा जिल्हा बँकेलाही ईडीने दोन दिवसांपूर्वी नोटीस बजावली आहे. यामध्ये केलेला कशासाठी व किती कर्ज पुरवठा केला? त्याची परतफेड नियमित होतेय काय? कर्ज पुरवठा कशाच्या आधारावर केला आहे? आदी माहिती ईडीने मागितली आहे. त्यामुळे नाबार्डचे सर्वोत्कृष्ट बँकेचे सलग सात पुरस्कार मिळविणाऱ्या बँकेलाच जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणी नोटीस आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.  बँकेचे बहुसंख्य संचालक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे संबंधित आहेत. ज्यावेळी हा कर्जपुरवठा केला तेव्हा आणि आताही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे बँकेचे अध्यक्ष आहेत.

‘ईडी’ च्या नोटीसीचा कोणताही परिणाम जिल्हा बँकेवर होणार नाही –

याबाबत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी सांगितले की, बँकेने जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांना कर्जपुरवठा केला आहे. हा कर्जपुरवठा रिझर्व्ह बँक व नाबार्डच्या धोरणानुसारच केलेला आहे. त्यानुसार जरंडेश्वर कारखान्याला बँकेने २०१७ मध्ये १३२ कोटींचा कर्जपुरवठा केला होता. सध्या ९६.५० कोटी रूपये येणे बाकी आहे. जरंडेश्वर कारखान्याकडून वेळेत परतफेड सुरू असून या कर्जप्रकरणात सक्षम पुरावे, जमीन व मालमत्ता तारण घेतलेली आहे. ही सर्व माहिती ईडीने मागवली आहे. त्यामुळे ईडीच्या नोटीसीचा कोणताही परिणाम जिल्हा बँकेवर होणार नाही. जिल्हा बँकेला ईडीची नोटीस आल्यानंतर याबाबतची माहिती बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, उपाध्यक्ष सुनील माने, संचालक व पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि व्यवस्थापक मंडळाला देण्यात आली आहे. बँकेचे मार्गदर्शक वरिष्ठ संचालक विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी बँकेत थांबून जरंडेश्वरच्या कर्जप्रकरणाची सर्व माहिती शुक्रवारी (दि ९) घेतली आहे. याबाबत त्यांनी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चाही केली यानंतर यामध्ये कोणतीही त्रुटी नसल्याचे सांगितले जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button