breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा शैक्षणिक विस्तार होणार

पिंपरी – पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा शैक्षणिक विस्तार होणार आहे. याकरिता नवनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील 27 एकर जागा उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राव यांनी घेतला आहे,अशी माहिती भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी दिली.

याबाबत आमदार लांडगे यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण हद्दीतील मौजे चिखली येथील ग.नं. 539 मधील जमीन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे संस्थेला शैक्षणिक विस्तार प्रयोजनाकरिता देण्यात यावी, अशी विनंती कॉलेज प्रशासनाने शासनाकडे केली होती. त्यानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभाग व वित्त विभाग यांनी दिलेल्या अभिप्रायाच्या अनुषंगाने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम 38 व 40 मधील तरतुदीनुसार, तसेच महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे) नियम, 1971 च्या कलम 5, 6 व 8 मधील तरतुदीनुसार अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे या शासकीय शैक्षणिक संस्थेच्या विस्ताराकरिता प्राधिकरण हद्दीतील स.नं. 539 मधील पेठ क्रमांक 14 मधील 11.30 हे.आर. क्षेत्र महसूलमुक्‍त किंमतीने कब्जेहक्काने नियमित अटी व शर्तींवर तसेच अटी व शर्तींच्या अधीन राहून महाराष्ट्रा शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. तसेच, उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सदर जमिनीचे हस्तांतरण झाल्यानंतर अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे या संस्थेस शैक्षणिक विस्तार प्रयोजनासाठी नाममात्र 1 रुपया या दराने 30 वर्षांच्या भाडेपट्टयाने प्रदान करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी राव यांनी दिले असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

आमदार महेश लांडगे म्हणाले, ‘भोसरी विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी “भोसरी व्हीजन-2020′ हे महत्त्वाकांक्षी अभियान हाती घेतले आहे. त्याला आता दोन वर्षे पूर्ण होत आहेत. या अभियानाअंतर्गत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षण सुविधा भोसरीसह पिंपरी-चिंचवडमध्ये उपलब्ध करण्याबाबत पुढाकार घेण्यात येत आहे. त्यादृष्टीने राज्यातील अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रातील नामांकित शासकीय शिक्षण संस्था असलेल्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे या संस्थेच्या शाखेचा विस्तार भोसरीत व्हावा. यासाठी जिल्हा प्रशासन तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे पाठपुरावा सुरू केला होता. चिखली येथील प्राधिकरणाच्या हद्दीतील 27 एकर जागा अभियांत्रिकी महाविद्यालयाला हस्तांतरित करण्याचा जिल्हाधिकारी नवलकिशोर राव यांनी घेतलेला निर्णय म्हणजे “भोसरी व्हीजन-2020′ दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे’.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button