breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उपोषणाच्या नवव्या दिवशी जरांगें पाटीलांचं आंदोलकांना संबोधन

Manoj Jrange Patil Hunger Strike : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. आज सकाळी वैद्यकीय पथकाने मनोज जरांगे पाटील यांचा बीपी तपासला गेला. मनोज जरांगे यांची नाडी तपासली गेली. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती सध्या स्थिर आहेमराठा समाजाला ओबीसी कोट्यामधून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहेत. उपोषणाच्या नवव्या दिवशी मनोज जरांगे यांनी उपस्थितांना संबोधित केलं. आंदोलनाची पुढची दिशा काय असेल यावर मनोज जरांगे  यांनी भाष्य केलं.

उद्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. त्यामुळे शिवजयंती आदर्श साजरी करा. आंदोलनाची दिशा २० तरखेनंतर ठरवणार आहे. आंदोलन दरम्यान विद्यार्थ्यांना त्रास झाला नाही पाहिजे. सग्या सोयऱ्याची सरकारने अंमलबजावणी केली पाहिजे. ज्यांची नोंद मिळाली त्या नोंदी आधारे सग्या सोयऱ्यांना आरक्षण द्यावं. २०, २१ तारखेला सग्या सोयऱ्याची अध्यादेशाची अंमलबजावणी करावी. जर अंमलबजावणी केली नाही. सगे सोयऱ्याची भूमिका घेतली नाही तर लगेच पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

हेही वाचा – ‘मतदार नोंदणीसाठी महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा’; जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

२१ तारखेला सग्या सोयऱ्याची निर्णय झाला नाही. तर पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे. कारण मराठे ओबीसीमध्येच आहेत. शंभर दोनशे लोकांसाठी मराठ्यांचं वाटोळं होईल. सहा करोड मराठ्यांचे मागणे आहे ओबीसीतून आरक्षण पाहिजे, असं मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले.

जे येतील त्यांचे स्वागत केलं जाईल. आमच्या दाराच्या काड्या मोडल्या आहेत. अजित पवार यांनी अधिवेशनात सग्या सोयऱ्याबाबत ही बहुमताने मत मांडावं. ५० टक्क्यांच्या आत आरक्षण येऊ शकत नाही. ते ५० टक्क्यांच्या वर जाणार आहे. नव्या आरक्षणासाठी मोठ्या मोठ्या घराण्याचे ऐकावे लागेल. सरकार त्याला बळी पडत आहे असे म्हणता येणार नाही. ज्यांच्या नोंदी मिळल्या नाहीत त्याना नवं आरक्षण असेल तर तो गैरसमज काढून टाका. मराठे ओबीसी मध्ये आहेत. सगयासोयऱ्या ची अंमलबजावणी करा, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button