TOP Newsताज्या घडामोडीपुणेमुंबई

खोपोलीजवळ साबणाचा ट्रक उलटून चालकाचा मृत्यू

लोणावळा : मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर खोपोली जवळ साबणाचा ट्रक उलटला. या घटनेत चालकाचा मृत्यू झाला. साबणाचे खोकी द्रुतगती मार्गावर पडल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. द्रुतगती मार्गावर रात्री पावणे दहाच्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर अपघात झाला. मुंबईकडे जाणारा ट्रक खोपोलीजवळ उतारावर उलटला.

ट्रकमधील साबणाचे खोके रस्त्यावर पडले अपघातात ट्रकचालक गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारांसाठी दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वी त्याचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच आरआयबीचे पथक, महामार्ग पोलीस तसेच खोपोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. द्रुतगती मार्गावर पडलेले साबणाचे खोकी बाजूला करण्यात आले. अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाल्याने कोंडी झाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button