ताज्या घडामोडीराष्ट्रिय

Paytm, Gpay ला टक्कर मिळणार? टाटा ग्रुपही येणार डिजिटल पेमेंट विश्वात

स्टीलपासून मीठापर्यंत सर्वंच क्षेत्रात क्रांती करणाऱ्या टाटा ग्रुपने आता डिजिटल पेमेंट विश्वात पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा लवकरच युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजेच युपीआय ऍप आणणार असून यासाठी त्यांनी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे मंजुरीसाठी अर्ज पाठवला आहे. ही मंजुरी मिळताच कंपनी आपली UPI सर्व्हिस लाँच करणार आहे.

थर्ड पार्टी प्रोव्हायडर म्हणून काम करण्यासाठी टाटाने NPCI कडे अर्ज केला आहे. त्यामुळे NPCI कडून परवानगी मिळताच टाटा लवकरच डिजिटल पेमेंटसुद्धा सुरू करू शकते. तसेच, टाटा ग्रुप, आपल्या डिजिटल व्यावसायिक युनिट टाटा डिजिटलद्वारे, त्याच्या UPI पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ICICI बँकेशी चर्चा करत आहे. UPI पेमेंट प्लॅटफॉर्म, जर NCPI ने मंजूर केले तर, टाटा ग्रुपला आपल्या ग्राहकांसाठी ई-कॉमर्स एक्सपेरिअन्स वाढविण्यात मदत होईल.

या नव्या डिजिटल पेमेंट ऍपचे नाव टाटा न्यू असे ठेवण्यात येणार असून पुढील महिन्यात आयपीएलच्या सत्रात या ऍपचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे Bigbasket, 1MG, Croma, Tata Cliq आणि Tata Group च्या फ्लाइट बुकिंग सर्व्हिस एकाच अ‍ॅपमध्ये सहज एक्सेस करता येईल.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button