breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

धक्कादायक! तेलंगणामध्ये विहिरीत आढळलेल्या त्या नऊ मृतदेहांचे गूढ उकलले

तेलंगणमधील वारंगलजवळ असणाऱ्या गौरीकुंटा गावामधील विहिरीमध्ये अढलेल्या नऊ मृतदेहांचं गूढ उकललं आहे. २१ मे रोजी गोणी शिवण्याचे काम करणाऱ्या एक ४८ वर्षीय कामगाराचे आणि त्याच्या कुटुंबातील तीन सदस्यांचे मृतदेह एका विहिरीमध्ये अढळून आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच २२ मे रोजी याच याच विहिरीमध्ये आणखीन पाच जणांचे मृतदेह सापडले असून त्यापैकी दोन मृतदेह हे कामगाराच्या मुलांचे असल्याचे स्पष्ट झालं होतं. या प्रकरणामध्ये आता पोलिसांनी या कामगाराकडे शिवणकाम करणाऱ्या संजय कुमार यादव या ३० वर्षीय कामगाराला मंगळवारी (२६ मे २०२० रोजी) अटक केली आहे.

वारंगलचे पोलिस आयुक्त व्ही. रविंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार संजय हा मृत व्यक्तीच्या गोणी शिवण्याच्या कारखान्यामध्ये काम करायचा. रफिका नावाच्या एका महिलेबरोबर संजय राहत होता. संजयच्या कारखान्याचा मालक मसूद आलम हा रफिकाचा मामा होता. ४८ वर्षीय मसूदबरोबरच त्याची पत्नी, मुलगी, दोन मुलं आणि तीन वर्षाची नातीचा मृतदेह विहरीमध्ये सापडले होते. त्याचबरोबर मसूदकडे काम करणारे मूळचे बिहारचे असणारे श्रीराम, श्याम आणि त्रिपुरामधील शकील अहमद या तीन कामगारांचेही मृतदेह विहिरीमध्ये सापडले होते.

मसूद हा २० वर्षांपूर्वी तेलंगणमध्ये आला. येथे तो विणकाम करणाऱ्या कारखान्यामध्ये काम करु लागला. त्यानंतर त्याची भाची रफिका तिच्या तीन मुलांना घेऊन मसूदच्या कुटुंबासोबत राहू लागली. दरम्यानच्या काळात रफिका आणि संजयचे सूत जुळले आणि रफिका आपल्या मुलांना घेऊन संजयबरोबर वेगळी राहू लागली. रफिका आणि संजय यांचे रफिकाच्या मुलीच्या लग्नावरुन भांडण झालं. रफिकाच्या मुलीचे लग्न लावून देण्यासंदर्भात विचार करणाऱ्या संजयला तिने सुनावले. यावरुनच वाद अगदी टोकाला गेला. याच वादानंतर संजयने रफिकाला संपवण्याचा निर्णय घेतला. संजयने रफिकाबरोबरच मसूदच्या कुटुंबाला आणि त्यावेळी तेथे उपस्थित असणाऱ्या तीन कामगारांनाही ठार केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संजयने रफिकाला आपण पश्चिम बंगालला जाऊन तुझ्या नातेवाईकांशी बोलून लग्न करु असं सांगून स्वत:च्या आई-बाबांना भेटण्यासाठी जायला राजी केलं. सात मार्च रोजी हे गरिब रथने पश्चिम बंगलला जाण्यास निघाले. प्रवास सुरु झाल्यानंतर संजयने रफिकाला ताकामधून बेशुद्ध होण्याचे औषध दिलं त्यानंतर गळा दाबून तिची हत्या केली. पहाटे तीनच्या सुमारास ट्रेन पश्चिम गोदावरी जिल्ह्यातून जात असताना संजयने रफिकाचा मृतदेह बाहेर फेकला. पोलिसांना रफिकाचा मृतदेह सापडला मात्र ओळख न पटल्याने त्यांनी याची अपघाती नोंद करुन घेतली. या प्रकरणात कोणालाही पोलिसांनी अटक केली नव्हती.

संजय पुन्हा वारंगलला आला आणि त्याने त्यांची आई पश्चिम बंगालमध्येच थांबल्याचे मुलांना पटवून दिलं. मात्र मसूद आणि त्यांची पत्नी निशा यांना संजयवर संक्षय आला. त्यांनी पश्चिम बंगालला फोन करुन रफिकाबद्दल चौकशी केली असता ती येथे आलीच नसल्याचे तिच्या पालकांनी सांगितलं. त्यानंतर मसूद आणि निशा यांनी संजयला आम्ही तुझ्याविरोधात पोलिसांत तक्रार करु अशी धकमी देत रफिका कुठे आहे असं विचारलं. मात्र संजय उत्तर द्यायला तयार नव्हता. दरम्यानच्या काळात २५ मार्चपासून सुरु झालेल्या लॉकडाउनमुळे मसूद आणि संजय यांचा संपर्क झाला नाही. मसूद सतत फोन करण्याचा प्रयत्न करत होते. अखेर १५ एप्रिलला संजयशी संपर्क झाल्यानंतर मसूद यांनी पुन्हा त्याला पोलिसांत जाण्याची धमकी दिली.

संजय २० एप्रिल रोजी मसूद यांच्या घरी आला. संध्याकाळी घरी आल्यानंतर त्याला मसूद यांच्या कुटुंबाबरोबरच तीन अन्य मजुरही तेथे असल्याचे दिसले. संजयने आपल्याबरोबर झोपेच्या ५०-६० गोळ्या आणल्या होत्या. त्या त्याने रात्री जेवणासाठी केलेल्या डाळीत टाकल्या. जेवणानंतर सर्वांना गाढ झोप लागली. त्यानंतर संजयने एक एक करुन कुटुंबातील व्यक्तींना गोणीमध्ये भरुन घराजवळील विहिरीमध्ये टाकलं. झोपेच्या गोळ्यांचा परिणाम झाल्याने कोणालाही प्रतिकार करता आला नाही. रात्री दोन ते पहाटे पाच दरम्यान तीन तासामध्ये संजयने नऊ जणांना विहिरीमध्ये फेकल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मसूदच्या कॉल डेटावरुन पोलिसांनी संजयची चौकशी सुरु केली होती असंही पोलिसांनी सांगितलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button