breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

परशुराम घाटात दरडीच्या ढिगाऱ्याखाली सापडल्याने चालकाचा मृत्यू

चिपळूण |

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळून ढिगाऱ्याखाली सापडलेल्या जेसीबी चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा कामगार वेळीच बाजूला झाल्यामुळे बचावला. या घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुमारे ७ तास ठप्प होती. ती लोटे—चिरणी मार्गाने वळवण्यात आली. दरम्यान धोकादायक दरड काढण्यासाठी मंगळवारी रात्रीपासून बुधवारी सकाळपर्यंत घाटातील वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. मुंबई—गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक लोटे—चिरणी मार्गे वळविण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून परशुराम घाटात चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात डोंगर कटाई सुरू असून यामध्ये काही दिवसांपूर्वी घाटातील दगड पेढे बौद्धवाडी येथील एका घरावर पडून मोठे नुकसान झाले. सुदैवाने त्या वेळी घरात कुणी नसल्याने जीवितहानी टळली. ही घटना ताजी असतांनाच मंगळवारी सकाळी ८ वाजता परशुराम घाटात चौपदरीकरणाचे काम करत असताना कापलेल्या डोंगराची दरड अचानक कोसळली. त्याचा भराव थेट तेथे काम करणाऱ्या जेसीबीवर आल्याने तो ढिगाऱ्याखाली अडकला. जेसीबीमध्ये दोन कामगार अडकले होते. त्यापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

दरम्यान, डोंगरावरील भराव खाली येण्याची शक्यता असल्याने परशुराम घाटातील वाहुतक दोन्ही बाजूने बंद करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी ग्रामस्थांसमेवत घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांनी काही मुद्दे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वास सुर्वे, प्रवीण पाकळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. घाटातील धोकादायक दरड काढण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button