breaking-newsTOP Newsमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५ लाख ८४ हजार ७५४ वर

  • मुंबईत १,२५४, पुण्यात २,४३२ नवे रुग्ण

मुंबई – महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात शनिवारी दिवसभरात १२ हजार ६१४ नवे कोरोना रुग्ण आढळले. तर ३२२ मृत्यूंची नोंद झाली. तसेच ६ हजार ८४४ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. यासह राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ५ लाख ८४ हजार ७५४ वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा १९ हजार ७४९ इतका झाला आहे. तर महाराष्ट्रात सध्याच्या घडीला १ लाख ५६ हजार ४०९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आजवर ४ लाख ८ हजार २८६ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतोय. मुंबईत शनिवारी दिवसभरात १ हजार २५४ नवे कोरोना रुग्ण आढळले, तर ४८ कोरोना रुग्णांची आपला जीव गमावला. तसेच ८८८ जण कोरोनामुक्त झाले. यासह मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख २७ हजार ७१६ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत १ लाख २ हजार ७४९ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

पुणे जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात २ हजार ४३२ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. यात पुणे शहरातील सर्वाधिक १ हजार १७७ रुग्णांचा समावेश आहे. तसेच जिल्ह्यात शनिवारी ६२ रुग्णांचा मृत्यू झाला. यासह पुणे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता १ लाख २२ हजार ३९७ वर पोहोचली आहे. तर कोरोनाबळींचा आकडा २ हजार ९५७ इतका झाला आहे. दरम्यान, दिवसभरात २ हजार १७६ कोरोना रुग्ण बरे झाले असून जिल्ह्यात आतापर्यंत ९३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button