breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: ‘माझ्या नवऱ्याने कोरोनाग्रस्तांची काळजी घेतली पण मृत्यूनंतर त्यांचाच अपमान’, रुग्णवाहिकेवर स्थानिकांचा हल्ला

करोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्या एका डॉक्टरच्या दफनाला चेन्नईतील दोन वेगवेगळया दफनभूमीमध्ये विरोध झाला. या डॉक्टरचा मृतदेह असलेल्या रुग्णवाहिकेवरही हल्ला करण्यात आला. कुटुंबीयांना मृत डॉक्टरच्या पार्थिवाचे अखेरचे दर्शनही घेता आले नाही. या सर्व प्रकारामुळे डॉक्टरच्या कुटुंबाला जबर धक्का बसला आहे.

“माझ्या नवऱ्याने करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची काळजी घेतली. पण मृत्यूनंतर त्यांचाच अपमान झाला आहे” अशी खंत मृत डॉक्टरच्या पत्नीने एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केली. ‘आम्हाला त्यांना एकदा शेवटचे पाहायचे आहे हीच माझी आणि मुलांची एकमेव इच्छा आहे’ असे मृत डॉक्टरच्या पत्नीने सांगितले.

नेमकं काय घडलं?
“डॉक्टरांचा मृत्यू झाल्यानंतर दफनासाठी किलपॉक दफनभूमीच्या प्रशासनाकडून परवानगी घेण्यात आली होती. पण त्या भागातील स्थानिकांनी दफनविधीवर आक्षेप घेत तिथे मृतदेहाचे दफन करण्याला विरोध केला. त्यामुळे आम्हाला माघारी फिरावे लागले” अशी माहिती डॉक्टरांच्या पत्नीने दिली.

“त्यानंतर आम्ही अण्णानगर येथील दफनभूमीमध्ये पोहोचलो. तिथे स्थानिकांच्या दुसऱ्या एका गटाने वाद घातला व दफनाला विरोध केला. काही वेळाने त्यांनी डॉक्टरांचे पार्थिव असलेल्या रुग्णवाहिकेवर हल्ला केला. रुग्णवाहिकेच्या काचा फोडल्या. ड्रायव्हर, स्वच्छता कर्मचारी या हल्ल्यात जखमी झाला” असे डॉक्टरच्या पत्नीने सांगितले.

“किलपॉकच्या प्रिस्टकडून आम्ही दफनविधीसाठी परवानगी घेतली होती. पण स्थानिकांनी आम्हाला तिथे दफनविधी करु दिला नाही. अखेर वेल्लाप्पानचावेडी येथे दफन करावे लागले. प्रशासन त्यांचे काम योग्य पद्धतीने करत आहे. त्यांची चूक नाही” असे या डॉक्टरच्या पत्नीने सांगितले.

“या सर्व परिस्थितीत आम्ही दफनविधी केला. पण मी त्यांना शेवटचे पाहू सुद्धा शकले नाही. मी ३० वर्ष त्यांच्यासोबत काढली पण मागच्या पंधरा दिवसांपासून मी त्यांना पाहिले नव्हते. हा त्यांचा अनादर आहे. त्यांचा व्यवस्थित दफनविधी झाला तरच माझ्या नवऱ्याच्या आत्म्याला शांती मिळेल” असे डॉक्टरच्या पत्नीने सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button