breaking-newsTOP Newsआरोग्य

आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी हे चहा प्या, पोटाच्या तक्रारी होतील कमी..

आरोग्यदायी चहा, लिंबू पाणी असं काही फार उपयोगी पडेल

आरोग्य चांगलं राहणं म्हणजे आपल्या दररोजच्या खाण्याच्या-पिण्याच्या सवयी जपल्याचा चांगला परिणाम होय. ज्यामुळे प्रसन्न वाटण्यास मदत होते आणि आजार, रोग आपल्यापासून लांब राहतात. पण हे सगळं शक्य होतं ते खाण्याच्या अचूक वेळा आणि योग्य व्यायाम केल्यानेच. याशिवाय तुम्हाला आरोग्यदायी चहा, लिंबू पाणी असं काही फार उपयोगी पडेल. म्हणजे पोटाच्या तक्रारीदेखील कमी होतात.
पुदीन्याचा चहा : आपण पुदीन्याची पाने खाऊ शकतो तसे त्याचा चहा करून पिला तरी आपल्या आरोग्यासाठी ते फायदेशीर राहील. हा चहा पिल्याने बॉडी डिटॉक्स होते. ज्यामुळे विषारी पदार्थ शरीरातुन बाहेर पडतात. यांसह पोटासंबंधी समस्याही दूर होतात. यासाठी पुदीन्याच्या पानांचा चहा तयार करून पिलेला चांगला असेल. ज्याने रक्त शुद्ध होण्यास मदत होते.

तुळशीच्या पानांचा चहा : तुळस ही रोगराई घालवणारी असते, असं जुन्या काळापासून म्हणतात. कारण तुळशीची पाने ताप असल्यास वा इतर अनेक आजारांत चावून खाल्ल्याने फरक पडत असतो. यामुळे आपल्या अंगणात तुळस असावी. औषधी गुणधर्म असल्याने तुळशीच्या पानांचा फार आधीपासून औषधी वापर केला जातो. कारण तुळशीत अँटीबॅक्टेरिअल आणि अँटीव्हायरल गुण असतात. तुळशीच्या पानांचा चहादेखील तुम्ही पिऊ शकता.

लिंबू : जर तुम्ही लिंबूपाणी प्याल तर तुमच्या पोटातील क्रिया सुरळीत होतील. कारण लिंबामध्येही चांगले गुणधर्म असतात जे आपल्या शारीरिक क्रिया उत्तम ठेवतात. समजा तुम्ही दररोज लिंबूपाणी प्यायलात तर त्याने तुमचं रक्त शुद्ध होईल आणि लघवीवाटे शरीरातील टॉक्सिन बाहेर जाण्यास मदत होईल. यामुळे चयापचय क्रिया सुधारते. तुम्ही सकाळीच कोरा अर्थात ब्लॅक टी तयार झाल्यानंतर त्यात लिंबू पिळून देखील पिऊ शकता त्यामुळे पोट साफ राहते.
हा लेख फक्त माहीतीसाठी असून वरील उपाय करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button