breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशराजकारणराष्ट्रिय

नरेंद्र मोदींच्या कर्तव्यनिष्ठेचं देशभरातून कौतुकः आईच्या अंत्यसंस्कारानंतर अवघ्या 2 तासांत कामाला सुरुवात

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 100 वर्षांच्या होत्या. हिराबेन मोदी यांच्यावर काही दिवसांपासून अहमदाबादमधील रुग्णालयात उपचार सुरू होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीनगर येथील स्मशानभूमीत त्यांच्या आईवर अंत्यसंस्कार केले.आज सकाळी साडेनऊ वाजता हिराबेन मोदी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र त्यानंतर अवघ्या दोनच तासांमध्ये मोदींनी पुन्हा कामाला सुरुवात केल्याचं चित्र पहायला मिळालं. आपल्या आईच्या अंत्यसंस्कारानंतर अवघ्या दोनच तासांमध्ये मोदींकडून वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. मोदी या कार्यक्रमामध्ये व्हीसीद्वारे सहभागी झाले होते. पंतप्रधानांच्या या कर्तव्यनिष्ठेचं देशभरातून कौतुक होत आहे.

मोदींच्या हस्ते वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पश्चिम बंगालमध्ये वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार होते. मात्र आज त्यांच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन झाल्यानं ते या कार्यक्रमात सहभागी होणार का याबाबत थोडी शंका होती. मात्र पंतप्रधान मोदी यांनी आपल्या आईवर आज सकाळी साडेनऊ वाजता अंत्यसंस्कार केले, व त्यानंतर लगेचच अवघ्या दोन तासांमध्ये मोदींनी वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवत उद्घाटन केलं. मोदी या कार्यक्रमात व्हीसीद्वारे सहभागी झाले होते. मोदींच्या या कृतीच देशभरातून कौतुक होत आहे.

‘वैयक्तिक कारणामुळे हजर राहाता आलं नाही’
पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमात व्हीसीद्वारे सहभागी झाले होते, मला पश्चिम बंगालला यायचं होतं. पण मी वैयक्तिक कारणामुळे पश्चिम बंगालला येऊ शकलो नाही. मी बंगालच्या जनतेची माफी मागतो, असं म्हणत मोदींनी वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button