breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजपच्या गटनेतेपदी नामदेव ढाके यांची निवड, विभागीय आयुक्तांच्या पत्राची प्रतिक्षा

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाने पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपच्या गटनेतेपदी नामदेव ढाके यांची आज सोमवारी (दि. 17) निवड केली. आता पुण्यातील विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांचे अधिकृत पत्र आल्यानंतर महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते ढाके यांची सभागृहनेते पदी अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पक्षनेते एकनाथ पवार यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांच्या जागी भाजपच्या निष्ठावंत नगरसेवकाला संधी देण्यासाठी स्थानिक पातळीवरून वरिष्ठ पातळीवरील पक्षश्रेष्ठींकडे अनेकांनी फिल्डिंग लावली होती. त्यातून नामदेव ढाके यांचे नाव पुढे आले. भाजपचे अध्यक्ष आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी देखील ढाके यांच्याच नावाची शिफारस केली होती. त्यावर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ढाके यांना पदावर बसविण्यास कोणतीही हरकत नसल्याची सूचना शहर भाजपला कळविली. त्यावर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे शिफारश पत्र शहराध्यक्ष आमदार लांडगे आणि आमदार जगताप यांच्या माध्यमातून विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांना देण्यात आले.

आज महापालिकेत सर्व सदस्यांची बैठक घेऊन पक्षनेते पदी नामदेव ढाके यांच्या नावाचा ठराव करण्यात आला. त्यावर हरकत नोंदविण्याची संधी भाजपच्या नगरसेवकांना देण्यात आली. सर्वांनी ढाके यांच्या नावाच्या ठरावावर स्वाक्षरी केली. दोन नगरसेवकांच्या स्वाक्षरी होणे बाकी आहे. दोघांच्या स्वाक्षरी झाल्यानंतर हा ठराव विभागीय आयुक्त म्हैसेकर यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. त्यांच्याकडून अधिकृत पत्र आल्यानंतर महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते नामदेव ढाके यांची सभागृहातील पक्षनेते म्हणून अधिकृतरित्या जाहीर केले जाईल. तुर्तास, भाजपकडून ढाके यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पक्षाचे गटनेते म्हणून निवड करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button