TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

देशाचे माजी पंतप्रधान अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहनसिंग आता व्हीलचेअरवर येणार अन् राज्यसभेत शेवटच्या रांगेत बसणार…

मुंबई : देशाचे माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहनसिंग हे अत्यंत अनुभवी संसदपटू आहेत. राज्यसभेमध्ये त्यांची बसण्याची जागा पहिल्या रांगेमध्ये असते; मात्र बसण्याच्या जागांमध्ये करण्यात आलेल्या बदलांनंतर आता डॉ. मनमोहनसिंग यांना शेवटच्या रांगेतली जागा देण्यात आली आहे. त्यामागे कोणतेही राजकीय कारण नाही. डॉ. सिंग यांच्या प्रकृतीच्या दृष्टीने हा बदल करण्यात आला आहे. 90 वर्षांचे डॉ. मनमोहनसिंग सध्या व्हीलचेअरवर आहेत. व्हीलचेअरवरून त्यांना सभागृहात येण्यासाठी जास्त कष्ट पडू नयेत, यासाठी त्यांची जागा बदलल्याचं काँग्रेस पक्षाच्या सूत्रांनी सांगितलं. ‘झी न्यूज’ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

काँग्रेसने या अधिवेशनात आपल्या खासदारांच्या बसण्याच्या जागेत काही बदल केले आहेत. पक्षाच्या सूत्रांनी सांगितलं की, माजी पंतप्रधान डॉ. सिंग आता व्हीलचेअरवर आहेत. त्यामुळे त्यांना येणं-जाणं सोयीचं व्हावं, यासाठी त्यांना शेवटच्या रांगेतली जागा देण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे सभागृहाचे उपसभापती हरिवंश यांच्या शेजारी पहिल्या रांगेत आपल्या नेहमीच्या जागेवर बसतील. याशिवाय, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम आणि दिग्विजय सिंह आता पहिल्या रांगेतल्या जागांवर बसतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button