TOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

पुणे पोलीस आयुक्तांना थेट फोन करा

पुणेः दर्शना पवार खून प्रकरण आणि सदाशिव पेठेतील तरुणीवर झालेला हल्ला, या दोन्ही घटनांमुळे पुणे पोलीस खडबडून जागे झाल्याचे दिसून येत आहे. एकीकडे शहरात कोम्बिंग ऑपरेशन सुरू असतानाच आता तक्रारी करण्यासाठी व्हॉट्सअॅप सेवा सुरू करण्यात आली आहे. आता पुणे शहरातील नागरिकांना थेट पोलिस आयुक्तांकडे तक्रार करता येणार आहे. पुणे शहर पोलिसांनी तक्रारी नोंदवण्यासाठी नवीन व्हॉट्सअॅप क्रमांक जाहीर केला आहे. 8975953100 या क्रमांकावर कोणीही कधीही तक्रार करू शकते.

तुम्ही पोलिस आयुक्तांचा व्हॉट्सअॅप क्रमांक सेव्ह करून त्यांना तुमच्या परिसरातील महिलांच्या सुरक्षेबाबत सूचना आणि प्रतिक्रिया देण्यासाठी मेसेज पाठवू शकता. यासोबतच इतर घटनांचा आढावा घेऊन कारवाई करण्यात येणार असून, आपत्कालीन सेवेसाठी 112 वर डायल करण्याचे आवाहन पुणे शहर पोलिसांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button