breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचा कोविड योद्धा सोहळा उत्साहात

– ३० कोविड योद्धांचा सन्मान

लातूर | प्रतिनिधी
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य लातूर जिल्ह्याचे वतीने डीपीडीसी हाॅल लातूर येथे कोविड योद्धा सन्मान समारंभ दिमाखात पार पडला. या वेळी विविध क्षेत्रातील 30 कोविड योद्धांचा सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के तर जिल्हाधिकारी बी. पी. पृथ्वीराज व पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांनी शुभेच्छा दिल्या.

विचारपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थांनी संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे, राज्य महिलाध्यक्षा डाॅ. सुधाताई कांबळे, राज्य उपाध्यक्ष व्यंकटराव पनाळे, अजय सुर्यवंशी, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, मराठवाडा अध्यक्ष विष्णू अष्टीकर, लातूर जिल्हाध्यक्ष लहू शिंदे, जिल्हा महिलाध्यक्षा वैशाली पाटील, जिल्हा संघटक संजय राजुळे, जिल्हा संपर्क प्रमुख नितीन भाले, जिल्हा समन्वयक सुनिल बरूरे, जिल्हा महिला संघटक छाया गुणाले, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष सोनटक्के आदी मान्यवर उपस्थित होते.

कोविड काळात आपल्या जीवाची पर्वा न करता समाज, राज्य व देशासाठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल डाॅ.प्रमोद घुगे, डाॅ. शितल पाटील, डाॅ.सुनिल होळीकर, डाॅ.पवन लड्डा, डाॅ.अजय अजनीकर, डाॅ.शिवशंकर नागापुरे, डाॅ.आशिष चलवदे, डाॅ.पुंडलिक सुडे, डाॅ.चाँद पटेल, डाॅ. चंद्रकांत चाटे, डाॅ. सचिन सगर, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण कांबळे, दिलीप आगळे, कृष्णा जोशी, सिध्दाजी मोरे, संजय राजुळे, योगेश शिंदे, प्रदिप विरकपाळे, धर्मपाल देवशेट्टे पोलीस कर्मचारी कल्पना जाधव, संपादक पंडित हनमंते, संपादक गणेश होळे, ग्रामीण पत्रकार माधव होणराव, पत्रकार नामदेव केंद्रे, दिपक काणेकर आदी मान्यवरांना संघाच्या वतीने कोविड योद्धांने सन्मानित करण्यात आले.

जिल्हा माहिती अधिकारी सोनटक्के यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघाच्या उत्कृष्ट कार्याबद्दल अभिनंदन व कौतुक केले. राज्य महिलाध्यक्षा डाॅ. सुधा कांबळे व राज्य उपाध्यक्ष व्यंकटराव पनाळे, मराठवाडा अध्यक्ष विष्णू अष्टीकर यांनी मनोगतातून संघाचे कार्य व भूमिका स्पष्ट केली. तर अध्यक्ष स्थानावरून डी.टी. आंबेगावे यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघाने महाराष्ट्रभर राहिलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

दुस-या सत्रामध्ये लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील पदाधिका-यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात लहू शिंदे यांनी संघाचे उद्देश व कोविड योद्धा सन्मान समारंभ घेण्यामागची भूमिका सांगितली. निवेदन संपादक सुर्यवंशी, कदम व शिवाजी गायकवाड यांनी तर आभार नितीन भाले यांनी मानले. याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लातूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, तालुकाध्यक्ष व कार्यकारिणी सदस्य, कर्नाटक राज्य व उस्मानाबाद जिल्ह्यातील पत्रकार व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button