breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

कोकण पदवीधरसाठी भाजप-मनसे आमनेसामने? मनसेकडून अभिजीत पानसेंना उमेदवारी

मुंबई | लोकसभा निवडणुकीपुर्वी मनसेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदासाठी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भूमिकेची महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगली होती. मात्र, आता महाराष्ट्रातील विधानपरिषदेसाठी पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली असून त्यात भाजपा विरुद्ध मनसे असा सामना रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सहीनिशी समोर आलेल्या पत्रामध्ये अभिजीत पानसे यांना महाराष्ट्र विधानपरिषदेसाठीच्या कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे निरंजन डावखरे यांची दावेदारी आत्तापर्यंत निश्चित मानली जात होती. तसेच, भाजपाकडून लवकरच त्यांच्या नावाची घोषणा केली जाईल, असंही बोललं जात होतं. मात्र, त्याआधीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अभिजित पानसे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

हेही वाचा     –      ‘६ जूननंतर आमच्याकडे इनकमिंग सुरू होणार’; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा 

कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपाचे निरंजन डावखरे हे दोन वेळा निवडून आले आहेत. त्यामुळे याहीवेळी त्यांचा या मतदारसंघावर दावा निश्चित मानला जात होता. पण मनसेनं जाहीर केलेली पानसेंची उमेदवारी आणि लोकसभा निवडणुकीत मनसेचा महायुतीमध्ये झालेला समावेश यामुळे या मतदारसंघातली समीकरणं नव्याने जुळवली जाऊ शकतात अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button